एक्स्प्लोर

योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल

लोक येतात जातात त्यांची कर्म त्यांच्यासोबत जातात, आगे बढो म्हणतो पण तुम्ही सोबत असणार आहात का? सध्या वकवक सुरु आहे, सगळं मला पाहिजे.

मुंबई : मागच्या कार्यक्रमाला मी इथं आलो होतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली, 58 वर्ष नेतृत्व करणं हे येड्या गबाळ्याचं काम नाही. जी परिस्थिती आपण पाहोत आहोत, आपण यावर काय बोलायच? बोलून काही होणार आहे का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सरकारवर हल्लाबोल केला. भारतीय कामगार सेनेच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्य आणि देशातील राजकीय परिस्थिती, कामगार क्षेत्रातील मक्तेदारी आणि केंद्रातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. तसेच, राज्यातील महिला अत्याचारांवरुन फडणवीसांवरही (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली.

आपण जी दिशा पकडली आहे, त्यावरुन पुढील वाटचाल होणार आहे हाच आपल्या वार्षिक सभेचा हेतू आहे. दत्ताजी यांचं नाव घ्यायलाच पाहिजे. सन 1966 साली शिवसेना स्थापन झाली आणि दरवाज्याची बेल वाजली आणि दत्ता साळवी आले आणि म्हणाले नोकरी सोडून तुमच्यासोबत काम करणार. बाळासाहेब म्हणाले इकडे काही नाही, काळोख आहे, तरी ते म्हणाले तुमच्यासोबत काम करायचं आहे. आज हजारो लाखो लोकांना त्यांच्यामुळे नोकऱ्या मिळाल्यात ही जिद्द होती, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली. 

लोक येतात जातात त्यांची कर्म त्यांच्यासोबत जातात, आगे बढो म्हणतो पण तुम्ही सोबत असणार आहात का? सध्या वकवक सुरु आहे, सगळं मला पाहिजे. तुम्हाला जायचं असेल तर जरूर जा. पण जे गेले त्यांचा काय सुरु आहे त्यांना विचारा. माणसं विकली जात आहेत. युनियन क्षेत्रात दुकानदारी सुरू आहे, असे म्हणत कामगार क्षेत्रातील सद्यस्थितीवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. सगळ्या उद्योगामध्ये माझे मालक ओळखीचे आहेत, पण माझं नातं गेटवर लागलेल्या भगव्याशी आहे, मालकाशी नाही. भगवा सोडून दुसरं फडक आलं तर त्याचा फक्त वापर डोळे पुसायला होईल. अमेरिका इराण युद्ध सुरु आहे, ते लेझीम सारखं चालू आहे. बातमी आलेली दुबईमध्ये उत्तर भारतीय काम करत आहे. देश म्हणतोय परत या.. ते म्हणताय देशात येऊन बेकारीने मरण्यापेक्षा आम्ही बॉम्बने मरू. मेलो तरी चालेल पण काम सोडून माझ्या देशात जाणार नाही, असं ते कामगार म्हणताय तरी नेत्यांकडे त्यांचं लक्ष जात नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.  

आम्ही हिंदू आहोत बुरखे पाय फाडणार?

नुसतं हायर आणि फायर सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणताय विरोधकांचे बुरखे फाडणार, अरे आम्ही हिंदू आहोत बुरखे काय फाडणार? मुख्यमंत्री तुम्ही लोकसभेत होतात का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. महिला आरक्षण बद्दल एवढा कळवळा असेल तर संसदेचं उद्घाटन करताना आणि अयोध्या राम मंदिरावेळी राष्ट्रपतींना का बोलवलं नाही? त्या आदिवासी आहेत म्हणून का? असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महिला आरक्षण लागू करा मी आज सुद्धा म्हणतो लागू करा, हा नवा विषय नाही. रवीश कुमार यांचा एपिसोड पाहा, काही राज्य कुटुंब नियोजन कार्यक्रम चांगल्याप्रकारे राबवत आहेत. मग, कुटुंब नियोजन करणे गुन्हा आहे? मोहन भागवतांचं चांगलं आहे, मुलं जन्माला घाला? त्यांना पोसणार कोण? त्यानंतर बेकारीचा काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. 

मुख्यमंत्री तिकडे अन् विनयभंग इकडे

आज तुमच्या भाजपात अरुण जेटलीच्या पातळीचा माणूस नाही, ममता बॅनर्जी वाघिणीसारखी लढते, त्या जिंकल्याच पाहिजे. 2 लाख CRPF चे जवान उतरवले तिकडे, मणिपूरला 20 हजार उतरवले होते. योगी आदित्यनाथ, आपले मुख्यमंत्री तिकडे इकडे महिला विनयभंग होतोय, ड्रग्स प्रकरण बाहेर येतय पण यांना बंगाल जिंकायचाय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना टोला लगावला. पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष होतंय, पाकडे कसे आले आणि कुठे गेले कळलं नाही. योगी आदित्यनाथ म्हणाले विवेकानंद बंगालचे सुपुत्र होते, ते म्हणाले तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा. पण, तुमच्या पक्षाचा आणि आझादीचा काय संबध? तुमचा पक्ष जिंकण्यासाठी फौजा घुसवताय, तुमची औकात नाहीये जिंकायची म्हणून तुम्ही ईडी, CBI घुसवताय. 100 दिवस शेळीचं जगण्यापेक्षा 1 दिवस वाघाचं जगा, ईडी CBI बाजूला ठेवा आणि मग शिवसेनेसोबत सामना करा, सध्या हा पुचाटाचा कारभार सुरु आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना सुनावलं. 

महाराष्ट्र धर्म देशाला वाचवू शकतो

शिवाजी महाराज नसते तर राम मंदिर बांधू शकलो असतो? संभाजी महाराज, ताराराणी नसत्या तर काय झालं असतं? औरंगजेब येथे गाडला गेला तो त्यांच्यामुळे. मेलो तरी चालेल, धर्मातर करणार नाही पक्षांतर दूरच. अन्यायला मोडून तोडून टाकणं हा महाराष्ट्र धर्म आहे, हा महाराष्ट्र धर्म देशाला वाचवू शकतो, अशी साद उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने घातली. 

हेही वाचा

लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget