(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप यूपीतील सर्व 80 जागा जिंकणार, योगी आदित्यनाथ यांचा दावा
Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सोमवारी दावा केला की, पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप यूपीमधील सर्व जागा जिंकेल.
Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सोमवारी दावा केला की, पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप यूपीमधील सर्व जागा जिंकेल. यूपीमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. नुकत्याच आझमगड आणि रामपूरमध्ये पोटनिवडणुका पार पडल्यानंतर यूपीमध्ये भाजपच्या लोकसभेच्या जागांची संख्या 66 झाली आहे.
भाजप नवा विक्रम करणार : मुख्यमंत्री योगी
लखनौमध्ये भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात योगी म्हणाले की, "केंद्रीय नेतृत्वाने चौधरी भूपेंद्र सिंह यांना उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. मी विश्वासाने सांगू शकतो की, चौधरी भूपेंद्र सिंह त्यांच्या संघटनात्मक क्षमतेच्या बळावर केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना वाढवण्यात, पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला घेऊन सरकार आणि संघटना यांच्यात समन्वय साधण्यात यशस्वी होतील. तसेच आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा राज्यातील सर्व जागा जिंकून नवीन विक्रम करेल. याच्या दोन दिवसांपूर्वी भूपेंद्र चौधरी यांनीही मेरठमध्ये दावा केला होता की, जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्या कामावर विश्वास आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप यूपीच्या सर्व 80 जागा जिंकेल.
भूपेंद्र सिंह चौधरी यांनी आज अधिकृतपणे उत्तर प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. नवे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल योगी म्हणाले, "बुथ लेव्हलपासून फील्ड लेव्हलपर्यंत संघटनेत मजबूत पकड असलेले नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ते केंद्र आणि राज्य यांच्यातील पुलाचे काम करतील. ज्यामुळे राज्य आणखी मजबूत होईल, अशी आशा आहे. नवीन उत्तर प्रदेश तयार करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी नवीन प्रदेशाध्यक्ष, नवीन संघटना मंत्र्यासोबत काम करू, असेही मुख्यमंत्री योगी म्हणाले.
दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमार यांचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप आणि जेडीयूमधील आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढील महिन्यात बिहारला भेट देऊ शकतात. गृहमंत्री अमित शाह त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यात सार्वजनिक सभांना संबोधित करणार आहेत. यादरम्यान बिहारच्या नेत्यांसोबत राज्यात रॅलीही काढण्यात येणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
आपची मोठी घोषणा; नायब राज्यपालांच्या विरोधात सर्व आमदार आज रात्री विधानसभेत राहणार, वाचा संपूर्ण प्रकरण
Mamata Banerjee Slams BJP: महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी पैसा कुठून आला, ममता बॅनर्जींचा भाजपला सवाल