यापुढे महायुती राहील की नाही याबाबत मी बोलणार नाही, पण शिवसेनेसोबत RPI कायम असेल, आमदार योगेश कदमांच्या वक्तव्याने खळबळ
Yogesh Kadam on Mahayuti : "भाजप असेल राष्ट्रवादी असेल आरपीआय असेल आज महायुतीच्या माध्यमातून सरकार चालवलं जातय. सरकारमध्ये मी एक आमदार म्हणून काम करत असताना मी अगदी जाहीरपणे सांगतो की, यापुढे महायुती राहील की नाही याबाबत मी भाष्य करणार नाही. मात्र, आरपीआय आणि शिवसेना नेहमी या मतदारसंघात सोबत राहिल"
Yogesh Kadam on Mahayuti : "भाजप असेल राष्ट्रवादी असेल आरपीआय असेल आज महायुतीच्या माध्यमातून सरकार चालवलं जातय. सरकारमध्ये मी एक आमदार म्हणून काम करत असताना मी अगदी जाहीरपणे सांगतो की, यापुढे महायुती राहील की नाही याबाबत मी भाष्य करणार नाही. मात्र, आरपीआय आणि शिवसेना नेहमी या मतदारसंघात सोबत राहिल", असे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार योगेश कदम म्हणाले. खेडमधील केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या नागरी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात दापोलीचे आमदार योगेश कदम बोलत होते. दरम्यान योगेश कदमांनी अशा प्रकारे वक्तव्य करुन महायुतीतील वादाची अप्रत्यक्ष कबुली दिलीये का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही ही युती राहिल
योगेश कदम म्हणाले, आमची आता नाळ जुडलेली आहे. आता ही नाळ कोणी तोडू शकत नाही. शिवाय आम्ही सातत्याने बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे. आम्ही एकत्रपणे शिवसेना आणि आरपीआयच्या बैठका घेत आहोत. शिवसेना आणि आरपीआयची युती लोकसभा आणि विधानसभेपुरती मर्यादीत न ठेवता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही ही युती राहिलं. मी आठवले साहेबांसमोर शब्द देतोय.
खेड तालुक्यातील आंबेडकर भवनासाठी आपण साडेतीन कोटींचा निधी आणला
पुढे बोलताना योगेश कदम म्हणाले, आज योगायोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यातील सामजिक विभागाचं खात आहे. खेड तालुक्यातील आंबेडकर भवनासाठी आपण साडेतीन कोटींचा निधी आणला. माझं एक स्वप्न आहे. आज सन्माननीय आठवले साहेब याठिकाणी उपस्थित आहेत, माझी त्यांना विनंती आहे. आम्ही जागा उपलब्ध करुन देऊ. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करण्यासाठी मी स्वत:पुढाकार घेईल.
रामदास आठवले म्हणाले, आजचा मेळावा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला होता. देशातील सर्व जाती धर्मांना एकत्र करण्याचं प्रयत्न केला. अन्याय सहन करत असताना आंबेडकरांसारखा माणूस देशासाठी लढत होता. देशातील विषमता नष्ट करण्यासाठी ते रात्र रात्र जागले. आज वेळे प्रमाणे आदर्श बदलले. पँथरचं संघटन मला रिपब्लिकन पक्षासाठी बरखास्त करावं लागलं. वेळ आली तर देईल मी जान, पण बदलू देणार नाही बाबासाहेबाचं संविधान...अशी घोषणाही आठवले यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असणार, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर