एक्स्प्लोर

मोठी बातमी : मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असणार, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर

Maha Vikas Aghadi Seat Sharing : आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात (Seat Sharing) मुंबईत महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभेसाठी जागा वाटपाच्या रणनितीवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

Maha Vikas Aghadi Seat Sharing : आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात (Seat Sharing) मुंबईत महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभेसाठी जागा वाटपाच्या रणनितीवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. मुंबईत महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढणार आहे. याबाबत महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi)  इतर पक्ष सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (Shivsena Uddhav Thackeray) 20 ते 22 जागांवर दावा ठोकलाय, याबाबतची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीये. 

शिवसेना ठाकरे गटाकडून 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 ते 22 जागांसाठी आग्रह

मुंबई झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत  मुंबईतील विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. महाविकास आघाडीत मुंबईत शिवसेना ठाकरे गटच जागा वाटपात मोठा भाऊ असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाला अधिक जागा देण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सकारात्मक आहे. शिवसेना ठाकरे गटाने 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 ते 22 जागांसाठी आग्रह धरला आहे. काँग्रेस पक्ष हा 13 ते 15 जागांवर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाच ते सात जागांवर दावा 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा पाच ते सात जागांवर आपला दावा सांगत आहे. काही जागा संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही.  मुंबईतील काही जागांवर महाविकास आघाडीतील दोन्ही  तर काही जागांवर तिन्ही पक्ष  दावा करत आहेत. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.  महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागा वाटपात 2019 मध्ये जिंकलेल्या जागा सोडून  उर्वरित जागांवर इच्छुक उमेदवार आणि त्या पक्षाची ताकद यावर चर्चा झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या मतदार संघामध्ये सुद्धा एक ते दोन जागांमध्ये अदलाबदल होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 7 जागा लढवण्याची तयारी सुरु

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP Ajit Pawar) मुंबईतील 7 जागा लढवण्याची तयारी सुरु केली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लवकरच मुंबईतील जागांचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये मुंबादेवी, भायखळा, अनुशक्तीनगर, चेंबूर, मानखुर्द- शिवाजीनगर, वांद्रे पूर्व आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघ लढण्यासाठी इच्छुक आहे. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलीये. 

कोणत्या मतदारसंघातून कोण इच्छुक ?

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार इच्छुक, भायखळा- समीर भुजबळ, अनुशक्ती नगर- सना मलिक, मानखुर्द शिवाजीनगर- नवाब मलिक, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ- झीशान सिद्धकी, विक्रोळी विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटातील एक चेहरा लवकरच सोबत येण्याची शक्यता आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ajit Pawar NCP : मोठी बातमी : अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईतील 7 जागा लढवण्याची तयारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 13 September 2024TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 13 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 7.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget