एक्स्प्लोर

विधानसभेला राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?; तटकरे अहमदनगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघाचा आढावा घेणार

विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या चाचपणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उद्या अहमदनगर दौऱ्यावर येणार आहेत

मुंबई : लोकसभा निवडणुकांतील निकालावरुन सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या ताकदीचा अंदाज आला आहे. त्यामुळे, विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांची तयारी आता सुरु झाली आहे. शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना व आमदारांना सूचना केल्या आहेत. दुसरीकडे भाजपनेही लोकसभा निवडणुकीतील पराभव झटकून विधानसभेची रणनिती आखायला सुरुवात केली आहे. आता, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेही लवकरच महाराष्ट्र दौरा करत आहेत. तत्पूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी जिल्हा दौऱ्यांना सुरुवात केली आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुका महायुतीतील पक्ष एकत्र लढणार की स्वबळावर याचाही अंदाज पक्षाचे नेते घेत आहेत. 

विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या चाचपणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उद्या अहमदनगर दौऱ्यावर येणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या बाराही जागा लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेस रणनीती आखत असून तसे संकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी दिले आहेत. अहमदनगर येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नाहाटा यांनी 12 जागांवरील चाचपणी सुरू असल्याचे संकेत दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उद्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असून ते सकाळच्या टप्प्यात शहर जिल्हा कार्यकारिणी तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तर दुपारी दक्षिण नगर जिल्हा लोकसभा मतदारसंघातील कार्यकारणी आणि पदाधिकाऱ्यांचे बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर, ते दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेतील घेणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष नाहाटा यांनी दिली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता विधानसभेचं जागावाटप लवकर करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. विशेष म्हणजे भुजबळ यांनी 80 ते 90 जागा आणि शिवसेनेला जेवढ्या जागा तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला देण्याचीही मागणी केली आहे. त्यामुळे, विधानसभेचं जागावाटपही मोठं अडचणीचं ठरणार असल्याचं दिसून येतं.  

अहमदनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघ

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे अहमदनगर जिल्ह्यात येत असून येथील 12 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव-पाथर्डी, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड या मतदारसंघाचा समावेश अहमदनगर जिल्ह्यात होतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सर्वच 12 जागांवर चाचपणी सुरू असून शरद पवार यांच्या पक्षाकडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असे येथील आमदार विभागले गेले आहेत. जिल्ह्यातील 6 मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असल्याचे पाहायल मिळते. 

कर्जत-जामखेड आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर, अकोलेचे आमदार किरण लहामटे हे अजित पवारांसोबत आहेत. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हेही अजित पवारांसोबत आहेत. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. अहमदनगर शहरमधून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे आमदार आहेत.

हेही वाचा

विधानसभेसाठी मोदी-शाहांचा प्लॅन, महाराष्ट्रात प्रभारी-सहप्रभारीपदी केंद्रातील दोन खास मंत्र्यांची नियुक्ती

महत्त्वाच्या बातम्या

माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
लवकरच मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार; आंदोलनावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळेही बोलल्या
लवकरच मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार; आंदोलनावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळेही बोलल्या
जरांगे पाटलांनी जरा धीरानं घ्यावं, 14 मागण्या मान्य झाल्यात, OBC समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका योग्यच : रामदास कदम
जरांगे पाटलांनी जरा धीरानं घ्यावं, 14 मागण्या मान्य झाल्यात, OBC समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका योग्यच : रामदास कदम

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर

Embed widget