एक्स्प्लोर

Hemant Patil : 'या' तीन कारणांमुळे हेमंत पाटलांचा राजकीय बळी; तिसऱ्या कारणाने भाजपची नाराजी ओढावून घेतली

Hingoli Lok Sabha Election : हेमंत पाटलांच्या विरोधात मतदारसंघात मोठी नाराजी असल्याचा अहवाल भाजपने दिला होता, त्यामुळेच हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेतल्याचं सांगितलं जातंय. 

हिंगोली : भाजपच्या विरोधानंतर एकनाथ शिंदेंना हिंगोलीतील (Hingoli Lok Sabha Election) आपलाच जाहीर उमेदवार मागे घेण्याची नामुष्की आल्यानंतर हेमंत पाटील समर्थकांमध्ये नाराजी पसरलीय. सुरूवातीपासूनच भाजपने हेमंत पाटलांना (Hemant Patil) विरोध केला होता. त्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नाव जाहीर केल्यानंतर मात्र भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. हेमंत पाटलांच्या विरोधात जनतेत नाराजी असल्याचं सांगत भाजपने शिंदेंवर दबाव टाकला आणि शिंदेंपुढे कोणताही पर्याय उरला नाही. शेवटी एकनाथ शिंदेंनी हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेतली आणि त्या ठिकाणी बाबुराव कदम कोहळीकर यांची उमेदवारी जाहीर केली. 

भाजपने या आधी हिंगोली मतदारसंघाचा अहवाल तयार केल्याचं सांगितलं जातंय. त्यामध्ये त्यांनी हेंमत पाटलांना जर उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव होणार असं सांगितलं होतं. कमी असलेला जनसंपर्क तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हेमंत पाटलांनी आपल्याच सरकराविरोधात राजीनामा देणं त्यांना भोवल्याचं दिसतंय.  त्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या मतावर कायम राहत हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर केली. आता मात्र ती बदलावी लागली. 

हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेण्याची कारणं काय? 

1. मतदारसंघात कमी असलेला संपर्क

हेमंत पाटील निवडून आल्यानंतर ते मतदारांच्या संपर्कात नसल्याचा आरोप केला जातोय. खासदार झाल्यानंतर मतदारसंघात नसायचे, बहुतांशवेळा मतदारसंघाबाहेरच असल्याचं सांगितलं जातंय. त्याचमुळे भाजपने त्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध केला. 

2. भाजपमधील नेते आणि कार्यकर्त्यांसोबतचे मतभेद 

हेमंत पाटील हे गेल्या वेळी जरी युतीमधून निवडून आले असले तरी निवडणुकीनंतर त्यांचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे मतभेद वाढल्याचं सांगितलं जातंय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हेमंत पाटील उद्धव ठाकरेंसोबत राहिल्याचा राग भाजपच्या पदाधिकाऱ्यांना होता. युतीमध्ये सोबत असताना कोणताही निर्णय घेण्यासाठी भाजपच्या लोकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता.

3. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देत आरक्षणासाठी उपोषण करणे 

राज्यात मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना हेमंत पाटलांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार असताना, मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने टीका करत असताना हेमंत पाटलांनी आपल्याच सरकारविरोधात भूमिका घेत राजीनामा दिल्याने भाजप त्यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं जातंय. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 16 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सRajkiya Shole Walmik Karad : वाल्मिक कराडची हजार कोटींचे मालक? ज्योती जाधवांची प्रॉपर्टी चर्चेतSpecial Story Sadhvi Harsha : कुंभमेळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधणारी साध्वी हर्षा कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Embed widget