Rahul Gandhi On PM Modi: 'चीनच्या मुद्द्यावर गप्प राहण्याचा निर्णय का घेतला?' राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल
Rahul Gandhi On Pm Modi: काँग्रेस नेते अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.
Rahul Gandhi On Pm Modi: काँग्रेस नेते अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, "चीनशी तिरंग्याचा व्यवहार करणाऱ्या पंतप्रधानांना चीनची घुसखोरी कशी दिसेल. खरा देशभक्त तोच आहे, जो आपल्या देशाचे कोणतेही नुकसान होऊ देत नाही. खरा देशभक्त तो आहे. जो देशाच्या प्रत्येक इंचाचे रक्षण करण्यासाठी लढतो. खरा देश सेवक तो असतो जो आपल्या मातृभूमीचा सन्मान आणि अभिमान राखण्यासाठी समर्पित असतो.''
राहुल गांधी पुढे म्हणाले की, "चीनने आपल्या देशाच्या सीमा काबीज करण्याचे धाडस केले आहे. सत्तेत येण्यापूर्वी चीनला लाल डोळे दाखवणारे पंतप्रधान 8 वर्षे चीनपुढे झुकले आहेत. चीनचे नावही घेत नाही. चीनविरुद्ध एक शब्दही त्यांच्या तोंडातून बाहेर पडत नाही. जनतेने निवडून दिलेल्या पंतप्रधानांनी जनतेचे हित सर्वोतोपरी न ठेवता चीनच्या बाबतीत मौन बाळगण्याचा निर्णय का घेतला?'', असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
राहुल गांधी म्हणाले, "देशाची शान असलेल्या तिरंग्यासाठी खादी सोडून चीनमधून आयात केलेल्या पॉलिस्टरचा सहारा घ्यावा लागला, यामागे अशी कोणती कारणे आहेत? मग चीनमधून भारताची आयातही वाढत आहे? पंतप्रधानांनी देशाला संबोधित करावे आणि याची कारणे समजावून सांगावी. प्रत्येक नागरिक भारताच्या सन्मानासाठी त्यांना पाठिंबा देईल, परंतु जेव्हा ते भारत मातेबद्दल असेल तेव्हाच.
तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षावर निशाणा साधत होता. मोदी नुकतेच म्हणाले होते की, "जेव्हा अमृत महोत्सवात संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात रंगला आहे, तेव्हा असे काहीतरी घडले आहे, ज्याकडे मला देशाचे लक्ष वेधायचे आहे. आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी, या पवित्र प्रसंगी. देशाला कलुषित करण्याचे प्रयत्न झाले. देशातील अशा लोकांची मानसिकताही समजून घेणे गरजेचे आहे."
पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, "काही लोक काळ्या जादूचा वापर करत आहेत. 5 ऑगस्टला काळी जादू पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचे आम्ही पाहिले. या लोकांना माझे आवाहन आहे की, काळी जादू करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अपमान करू नका.''
इतर महत्वाची बातमी:
RBI Guidlines : कर्जवसुलीसाठी बँका तुम्हाला धमकावतात? धमक्या देऊ नका... वसुली एजंट्ससाठी RBI ची नवी नियमावली
अखेर कष्टाचे फळ मिलाले, 20 रुपयांसाठी 22 वर्षे लढा, रेल्वेला द्यावी लागणार भरपाई