एक्स्प्लोर

Suvendu Adhikari Networth: ना कार, ना सोनं, एका रूपयाचं कर्जही नाही, ममता बॅनर्जींचा पराभव करून बंगालचे मुख्यमंत्री बनणाऱ्या शुभेंदू अधिकारी याचं नेटवर्थ किती?

Bengal New CM Suvendu Adhikari Networth: बंगालमधील भाजपचे एक प्रमुख नेते सुवेंदू अधिकारी हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. ते बंगालमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री असतील. त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घ्या सविस्तर.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा राजकीय बदल घडत असताना भाजपचे दिग्गज नेते शुभेंदू अधिकारी आता राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणारे शुभेंदू अधिकारी हे आता बंगालमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री असणार आहे. दरम्यान, त्यांच्या संपत्तीची माहितीही आता चर्चेचा विषय ठरत आहे.(Bengal New CM Suvendu Adhikari Networth)

Suvendu Adhikari Networth: त्यांच्या नावावर कोणतीही कार नाही सोने किंवा दागिने नाहीत

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, शुभेंदू अधिकारी यांची एकूण संपत्ती सुमारे ८५ लाख ८७ हजार रुपये इतकी आहे. यात चल आणि अचल संपत्तीचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या नावावर कोणतीही कार नसून त्यांनी सोने किंवा दागिन्यांचीही नोंद केलेली नाही.(Bengal New CM Suvendu Adhikari Networth)

Suvendu Adhikari Networth: रोख स्वरूपात केवळ १२ हजार रुपये 

प्रतिज्ञापत्रानुसार, शुभेंदू अधिकारी यांच्याकडे रोख स्वरूपात केवळ १२ हजार रुपये आहेत. त्यांच्याकडे स्वतःची खासगी कार नाही. तसेच सोने किंवा दागिनेही नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या चल संपत्तीची एकूण किंमत सुमारे २४ लाख ५७ हजार रुपये आहे.
त्यांच्या नावावर पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अ‍ॅक्सिस बँक तसेच काही सहकारी बँकांमध्ये मिळून १४ बँक खाती आहेत. या खात्यांमध्ये सुमारे ७ लाख ३४ हजार रुपयांची ठेव असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

याशिवाय त्यांनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये सुमारे ५ लाख ४५ हजार रुपये आणि किसान विकास पत्रामध्ये २ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या नावावर सहा एलआयसी पॉलिसी असून त्यांची किंमत सुमारे ७ लाख ७१ हजार रुपये असल्याचे सांगितले गेले आहे.

Suvendu Adhikari Networth: वडिलोपार्जित घरात त्यांचा हिस्सा अन् फ्लॅट्स 

शुभेंदू अधिकारी यांच्या अचल संपत्तीची किंमत सुमारे ६१ लाख ३० हजार रुपये आहे. त्यांची बहुतांश मालमत्ता पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात आहे, जो अधिकारी कुटुंबाचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. नंदीग्राममध्ये त्यांच्या नावावर सुमारे ९ लाख रुपयांची शेतीजमीन आहे. तसेच पंचदरिया आणि धर्मदासबर भागात बिगरशेती जमीन असून तिची किंमत सुमारे २७.५ लाख रुपये आहे. तामलुक आणि कुमारपूर येथे त्यांचे फ्लॅट्स आहेत, तर करकुली येथे वडिलोपार्जित घरात त्यांचा हिस्सा आहे. या निवासी मालमत्तेची एकूण किंमत सुमारे २४ लाख ७५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न १७ लाख ३८ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. आमदार म्हणून मिळणारे वेतन, खासदार निवृत्तीवेतन आणि व्यवसाय हे त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या नावावर कोणतेही कर्ज किंवा देणी नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करून चर्चेत आलेले शुभेंदू अधिकारी आता बंगालची सत्ता सांभाळण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget