(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vijaysinh Mohite Patil Speech : आपण चूका केल्या असतील पण, पवार साहेबांनी...विजयसिंह मोहिते पाटलांचे मोठ्या कालावधीनंतर भाषण!
Vijaysinh Mohite Patil Speech, at Madha Loksabha : आदरणीय पवार साहेबांचे मी मनापासून आभार मानतो. आपण चूका केल्या असतील, पण चूकांच्या बाबतीत त्यांनी मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे.
Vijaysinh Mohite Patil Speech, at Madha Loksabha : "आदरणीय पवार साहेबांचे मी मनापासून आभार मानतो. आपण चूका केल्या असतील, पण चूकांच्या बाबतीत त्यांनी मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. पुढच्या काळात आपण सर्वांनी धैर्यशील भैय्यांना निवडून द्यावे, अशी मी याठिकाणी विनंती करतो", असे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) म्हणाले. माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सभा घेतली. यावेळी विजयसिंह मोहिते पाटील बोलत होते. अकलूजमध्ये पार पडलेल्या या सभेला शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, धैर्यशील मोहिते पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते महेबुब शेखही उपस्थित होते.
काय म्हणाले विजयसिंह मोहिते पाटील?
मोदी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ढुंकून बघायला तयार नव्हते
शरद पवार म्हणाले, मी स्वत: केळी उत्पादक आहे. माझी सहा एकर केळी आहे. त्या केळीचं बेन जैन इरिगेशन इथून घेतो. यंदा केळीचे पीक उत्तम आहे, पण भाव 90 रुपयांच्या खाली आलाय. आज त्याचा उत्पादन खर्चही भागत नाही. हे नुसते केळीचे नाही, तर शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीचा झालेलं आहे. त्याचा परिणाम काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बळीराजा हा देशातील लोकांच्या अन्नाचा प्रश्न सोडवतो. जो भूकेचा प्रश्न सोडवतो त्याबद्दल आजचे सरकार गंभीर नाही. हजारोंच्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर शेतकरी येतात, त्यावेळी जबाबदारी सरकारची आहे, की यातून काही मार्ग काढला पाहिजे. पण मोदी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ढुंकून बघायला तयार नव्हते. शेवटी विरोधी पक्षाने त्यांना साथ दिली आणि काही ना काही निर्णय घ्यायची स्थिती निर्माण केली. सगळ्या गोष्टीचा एकच अर्थ आहे आजचे राज्यकर्ते हे शेतकरीविरोधी, तरूणांविरोधी, कष्टकरी-कामगारांविरोधी आहेत. आणि राज्यकर्ते मूठभर लोकांच्या हिताची जपणूक करणे यालाच आपले काम समजतायंत.
सत्तेचा गैरवापर कसा होतो याची अनेक उदारहरणे आहेत
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, सत्ता ही कोटींची असते, ती लोकांसाठी वापरायची असते. आज सत्तेचा गैरवापर कसा होतो याची अनेक उदारहरणे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या सत्तेचा गैरवापर करायचा, हे सूत्र घेऊन मोदी काम करत असतील, तर अशा सरकारला सत्तेपासून बाजूला कसे करता येईल हाच निकाल आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी उद्या श्रीराम पाटील यांच्यापुढील बटण दाबा. एका चांगल्या व्यक्तीला संघटनेने याठिकाणी संधी दिली आहे, त्यांना जनतेबद्दलची आस्था आणि संघटनेची माहिती आहे. तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली, तर त्यांच्या पाठीशी आम्हा सर्वांची शक्ती उभी करून केळी, कपाशी, सोयाबीन, कर्जबाजारीपणा अशा प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करता येईल. यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करा, ही विनंती.
इतर महत्वाच्या बातम्या
Video: तेच मैदान, तीच निवडणूक, शरद पवारांना पावसातील सभेची आठवण; हाती आसूड घेऊन गाजवलं सातारा