Video: तेच मैदान, तीच निवडणूक, शरद पवारांना पावसातील सभेची आठवण; हाती आसूड घेऊन गाजवलं सातारा
याच मैदानावर मागे सभा झाली होती त्यामध्ये उदयनराजेंचा पराभव झाला होता, आता आजची ही सभा पाहुन निकाल सांगायची गरज नाही, असे म्हणत शरद पवारांनी 2019 च्या पावसातील सभेची आठवण करुन दिली.
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या, धगधगत्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या सातारा (Satara) नगरीत आज लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यासाठी सभा घेतली. तर, दुसरीकडे शरद पवार यांनी शशिकांत शिंदेंच्या प्रचारार्थ सातरकरांन आवाहन केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवारांनी (Sharad Pawar) 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची आठवण करुन देत उदयनराजेंना टोला लगावला. शरद पवारांनी मंचावर येताच, त्यांच्या हाती शेतकऱ्यांचा आसूड देण्यात आला. त्यामुळे, आसूड हातात येताच त्यांनी मोदी सरकावर हल्लाबोल केला.
याच मैदानावर मागे सभा झाली होती त्यामध्ये उदयनराजेंचा पराभव झाला होता, आता आजची ही सभा पाहुन निकाल सांगायची गरज नाही, असे म्हणत शरद पवारांनी 2019 च्या पावसातील सभेची आठवण करुन दिली. यावेळी, व्यासपीठावर खासदार श्रीनिवास पाटील हेही उपस्थित होते.
शरद पवारांच्या भाषणातील मुद्दे
नरेंद्र मोदींनी एक ही अश्वासन पूर्ण केले नाही
महागाई ही त्यांनी दिलेली देणगी आहे
शेतीत जरा चांगला भाव आला की निर्यात बंदी
भ्रष्टाचाराबाबत सुप्रीम कोर्टाला दखल घ्यावी लागली
मोदीनी कॅशलेस भ्रष्टाचार आणला
महाराष्टातील जनता गद्दारना फितुरीला माफ करणार नाही
सातारा लोकसभा मतदार संघात इतिहास घडेल
मोदींनी देशावर मोठं संकट आणलं आहे
मोदींच्या कालखंडामध्ये चिनच्या प्रश्नाला महत्व दिलं नाहि आणि हजारो किलोमीटर भारताची जमीन चिन ताब्यात घेतली
मोदींनी आश्वासन दिल्याची चर्चा होतीये
महागाई कमी केली असं मोदी म्हणतात मात्र काय झालं हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही
शेतक-याला संकटातुन बाहेर काढण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलं होतं मात्र संपुर्ण शेतीव्यवस्था त्यांनी संकटात आणली