एक्स्प्लोर

Sharad Pawar: शरद पवारांच्या बाजूची खुर्ची काढली, विजयसिंह मोहिते पाटील शेजारी स्थानापन्न, नजरानजर होताच दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं

Pune News: पुण्यातील कोंढवे येथे माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी सर्व राजकीय नेते एकत्र आले होते. या सोहळ्याला संजय राऊत, हर्षवर्धन पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, श्रीनिवास पाटील यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

पुणे: सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात नवनवीन राजकीय समीकरणे आकाराला येताना दिसत आहेत. पक्षांतर, नवीन युती-आघाड्या आणि धक्कातंत्र असे अनेक राजकीय डावपेच रोज खेळले जात आहेत. या सगळ्यात बुधवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. बुधवारी संध्याकाळी पुण्यातील कोंढव्यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला राजकीय वर्तुळातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात अनेक बडे नेते उपस्थित असले तरी शरद पवार (Sharad Pawar) आणि विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Loksabha) रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीवरुन मोहिते-पाटील घराणे नाराज आहे. मात्र, भाजप या नाराजीला फारशी किंमत देत नसल्याने मोहिते-पाटील शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा बुधवारी सकाळपासून रंगली होती. त्यामुळे पुण्यातील लग्नसोहळ्यात झालेल्या शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

या लग्नसोहळ्याला शरद पवार, संजय राऊत, श्रीनिवास पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक बडे राजकीय नेते उपस्थित होते. लग्नसोहळ्याच्या ठिकाणी हे सर्व नेते बसले असताना विजयसिंह मोहिते-पाटील यांचे आगमन झाले. विजयसिंह मोहिते पाटील व्हीलचेअरवरुन याठिकाणी आले. तेव्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये असलेली खुर्ची रिकामी होती. विजयसिंह मोहिते पाटील त्याठिकाणी येताच कोणीतरी चपळाई दाखवत शरद पवार यांच्या बाजूची रिकामी खुर्ची काढली. त्यानंतर या मोकळ्या जागेत विजयसिंह मोहिते-पाटील यांची व्हीलचेअर ठेवण्यात आली. मोहिते-पाटील यांची व्हीलचेअर मागे घेत असताना शरद पवार यांनीही मदत केली. विजयसिंह मोहिते-पाटील स्थानापन्न झाल्यानंतर शरद पवार त्यांच्याशी हस्तांदोलन केले. यावेळी दोन्ही नेते एकमेकांकडे पाहून हसले. काहीवेळ पवार आणि मोहिते-पाटील एकमेकांच्या बाजूला बसून होते. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये मोघम संवादही झाला. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांची ही भेट माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणारी ठरु शकते.

विजयसिंह मोहिते पाटील तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच?

विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत. शरद पवार यांनी 1999 साली काँग्रेसची साथ सोडून वेगळा पक्ष काढल्यापासून विजयसिंह मोहिते पाटील त्यांच्यासोबत होते. परंतु,   2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते-पाटील गटाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. एका जाहीर कार्यक्रमात आपण अजूनही राष्ट्रवादीतच आहोत, राष्ट्रवादी सोडली नसल्याचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले होते.

आणखी वाचा

सकाळची ती चर्चा संध्याकाळी खरी ठरली, विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार लग्नसमारंभात एकत्र दिसले अन्...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्रेयसनं तळपदेनं सांगितला हार्टअटॅकनंतर अक्षयसोबत फॉलो केलेलं रुटीन, म्हणाला, 'अक्षय कुमारचा आयुष्यभर ऋणी'
श्रेयसनं तळपदेनं सांगितला हार्टअटॅकनंतर अक्षयसोबत फॉलो केलेलं रुटीन, म्हणाला, 'अक्षय कुमारचा आयुष्यभर ऋणी'
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं!
Jayant Patil: भांडायला भरपूर आयुष्य आहे, आता सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही; जयंत पाटलांचं महत्त्वाचं वक्तव्य
आधी सरकार येऊ द्या, मग तुम्हाला हवं त्याला मुख्यमंत्री करा; जयंत पाटलांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
SPY Universe : सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress On DGP : पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीबाबत आक्षेप, काँग्रेस राज्य निवडणूक आयोगाकडे आज तक्रार करणारDonald Trump leading : ट्रम्प यांचा 15 राज्यात विजय, 6 राज्यात आघाडीवर तर ९ राज्यात हॅरिसचा विजयAbp Majha Headlines Marathi News 8 Am Top Headlines  06 November 2024Special Report Mahim Constituency : माहीमची डील का झाली नाही? मनसे-शिवसेनेची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रेयसनं तळपदेनं सांगितला हार्टअटॅकनंतर अक्षयसोबत फॉलो केलेलं रुटीन, म्हणाला, 'अक्षय कुमारचा आयुष्यभर ऋणी'
श्रेयसनं तळपदेनं सांगितला हार्टअटॅकनंतर अक्षयसोबत फॉलो केलेलं रुटीन, म्हणाला, 'अक्षय कुमारचा आयुष्यभर ऋणी'
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं!
Jayant Patil: भांडायला भरपूर आयुष्य आहे, आता सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही; जयंत पाटलांचं महत्त्वाचं वक्तव्य
आधी सरकार येऊ द्या, मग तुम्हाला हवं त्याला मुख्यमंत्री करा; जयंत पाटलांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
SPY Universe : सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
Beed : बीड जिल्ह्यातील भाजप मराठा कार्यकर्त्याचे पक्षासोबतच राहणार असल्याचे थेट बॉण्डवर शपथपत्र; इतर कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
बीड जिल्ह्यातील भाजप मराठा कार्यकर्त्याचे पक्षासोबतच राहणार असल्याचे थेट बॉण्डवर शपथपत्र; इतर कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
Shivadi Vidhan  Sabha: उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लालबागचा राजाची... 'या' कारणामुळे सुधीर साळवींना उमेदवारी मिळाली नाही, आशिष शेलारांची थिअरी
उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लालबागचा राजाची... 'या' कारणामुळे सुधीर साळवींना उमेदवारी मिळाली नाही, आशिष शेलारांची थिअरी
Sharda Sinha Passes Away: बिहारची गानकोकीळा शारदा सिन्हा कालवश; 'मैंने प्यार किया', 'गँग्ज ऑफ वासेपूर 2' सह असंख्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन
बिहारची गानकोकीळा शारदा सिन्हा कालवश; 'मैंने प्यार किया', 'गँग्ज ऑफ वासेपूर 2' सह असंख्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Embed widget