Vijay Wadettiwar : वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, मुंडेंचा राजीनामा घ्या; बीडवरुन वडेट्टीवारांचे थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्यामागे खरा सुत्रधार वाल्मिक कराड आहे. त्यांचा अनेक खुनामध्ये हात आहे. परिणामी त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील (Beed Crime) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) यांनी निर्घुण हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. बीड जिल्ह्यात शनिवारी (दि.28) सर्व पक्षीय नेत्यांकडून आणि राज्यभरातील नागरिकांकडून मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर निषेध सभेतून सर्वपक्षीय नेत्यांकडून संताप देखील व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, याच मुद्यावरून आता विरोधकांनी ही सरकारवर कडाडून टीका करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उचलून धरला आहे.
अशातच हाच मुद्दा लावून धरत विरोधी बाकावरील काँग्रेसचे नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारला जाग येण्यासाठी आणखी किती वाट पाहताय? असा रोखठोक सवाल त्यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बीड प्रकरणात मोक्का लावू अशा वल्गना केल्या. मात्र अजून ही अटक झाली नाही. या घटनेचा सुत्रधार वाल्मिक कराड आहे. त्यांचा अनेक खुनामध्ये हात आहे. परिणामी त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, ते खुनाच्या गुन्ह्यात दिसतील-विजय वडेट्टीवार
बीडमध्ये (Beed Crime) मोर्चा निघाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला (CID) दिले होते. आज या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे याच मुद्दावरुन आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.मुंडे म्हणतात चौकशी करा, कुणाचे कुणाशी सबंध आहे हे तपासा. वाल्मिक कराडला शोधून आणा आणि त्यांची नार्को टेस्ट करा. म्हणजे त्यांचा समावेश खुनाच्या गुन्ह्यात दिसेल. तसेच सुरेश धस यांचा ७/१२ काढा. या प्रकरणात निव्वळ बोट दाखवू नका,असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्या - विजय वडेट्टीवार
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणतात त्यात तथ्य असू शकतं. ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला मारलं, कारण मुख्य आरोपीपर्यंत पोहचू नये. तस यात ही तथ्य असू शकतं. या घटनेचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदापासुन दुर ठेवलं पाहिजे, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या