Mahayuti : महायुतीमध्ये बिघाडी? विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून नाराजीनाट्य
विधान परिषदेच्या उमेदवारीवारी जाहीर करताना शिवसेनेला विश्वासात न घेता भाजपने परस्पर तीनही जागांची घोषणा केली. कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर या तीन जागांसाठी भाजपने परस्पर उमेदवारी जाहीर केलेत.
मुंबई : विधान परिषद निवडणूक उमेदवारीवरून महायुतीमध्ये बिघाडी झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.भाजपने विधान परिषदेसाठी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळतेय. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले. महायुतीचा धर्म भाजप पाळत नसल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपने मुंबई पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे, मुंबई पदवीधरमध्ये किरण शेलार आणि मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये शिवनाथ दराडे यांनी उमेदवारी जाहीर केलीय. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीतील मित्र पक्षांची कोणतीही संयुक्त बैठक झालेली नसताना उमेदवारी जाहीर करण्याची घाई का? असे म्हणत मित्र पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
विश्वासात न घेता तीनही जागा जाहीर
विधान परिषदेच्या उमेदवारीवारी जाहीर करताना शिवसेनेला विश्वासात न घेता भाजपने परस्पर तीनही जागांची घोषणा केली. कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर या तीन जागांसाठी भाजपने परस्पर उमेदवारी जाहीर केलेत. शिवसेनेकडून दीपक सावंत आणि संजय मोरे यांनीही अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ही नाशिक आणि मुंबईसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
महायुतीतील उमेदवार आमने सामने येण्याची शक्यता आहे.
युतीतील उमेदवार आमने- सामने येण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पारड जड आहे.त्यामुळे परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना माघार घेणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेकडून संजय मोरे आणि दीपक सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मात्र पक्षाकडून एबी फॉर्म अद्याप पर्यंत दिलेला नाही. भाजपच्या नेत्यांशी बोलून यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. जर हा वाद मिटला नाही तर महायुतीतील उमेदवार आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
26 जून रोजी मतदान
दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई (Mumbai) आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी 10 जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकांची तारीख बदलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे.