एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची 3 मतं ठरणार 'गेम चेंजिंग', कोणाला करणार मतदान? जाणून घ्या समीकरण

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत.

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बहुजन विकास आघाडीची तीन मत गेम चेंजिंग ठरणार आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नेमक्या कोणत्या बाजूला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

हितेंद्र ठाकुरांकडून महाविकास आघाडीच्या अन् महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी 

बहुजन विकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा, यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.  हितेंद्र ठाकूर यांनी मागील दोन दिवसापासून विविध नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार, ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या भेटी सुद्धा घेतल्या आहेत. 3 मतांमुळे  भेटीगाठीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

दगाफटका टाळण्यासाठी महायुती अन् महाविकास आघाडीच्या आमदारांची हॉटेलवारी 

विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा आमदारांच्या हॉटेलवारीला सुरुवात झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Elcection) तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह (Uddhav Thackeray Shivsena) अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (Ajit Pawar NCP) आणि भाजपने (BJP) आमदारांना हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व आमदार विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, हॉटेलवर मुक्कामी असणार आहेत. याशिवाय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि भाजपचे आमदार देखील हॉटेलवर मुक्कामी जाणार असल्याची माहिती आहे. 10,11 आणि 12  जुलै रोजी ठाकरेंचे 16 आमदार हॅाटेलवर मुक्कामी असणार आहेत. त्याचदरम्यान उद्धाव ठाकरे हॅाटेलमध्ये गाठीभेटी घेणार आहेत. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी  23 मतांचा कोटा असेल. विधानसभेत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणाची किती ताकद असेल आणि अकरावी जागा निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव कशी करावी लागणार याची आकडेवारी जाणून घेऊयात...

महाविकास आघाडी

राष्ट्रवादी शरद पवार - 12

उद्धव ठाकरे शिवसेना - 15 + 1 शंकरराव गडाख = 16

काँग्रेस - 37

एकूण - 65

महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करण्यासाठी चार किंवा त्यापेक्षा अधिक मतांची गरज पडेल.  

छोटे घटक पक्ष

1) बहुजन विकास आघाडी - 3

2) समाजवादी पक्ष - 2

3) एमआयएम - 2 

4) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 1

5) शेतकरी कामगार पक्ष - 1

एकूण - 9

महाविकास आघाडी एकूण आमदार - 65

महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ शकणारे पक्ष

1) समाजवादी 2

2) एमआयएम 2

3) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी 1

4) शेतकरी कामगार पक्ष 1 

महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे पक्ष लक्षात घेऊन एकूण आमदार - 71 आमदार

महायुती आमदारांची संख्या

राष्ट्रवादी (अजित पवार) 41

भाजपा - 103

शिवसेना - 38

महायुती पाठींबा देणारे आमदार

राष्ट्रवादी (अजित पवार)

1) देवेंद्र भुयार 

2) संजयमामा शिंदे 

राष्ट्रवादी + अपक्ष - 43

भाजपला पाठिंबा देणारे आमदार 

1) रवी राणा 

2) महेश बालदी 

3) विनोद अग्रवाल 

4) प्रकाश आवाडे 

5) राजेंद्र राऊत 

6) विनय कोरे 

7) रत्नाकर गुट्टे 

भाजप + मिञ पक्ष आणि अपक्ष- 103+ 7 = 110

एकनाथ शिंदे शिवसेना- 38

पाठिंबा देणारे आमदार - 10

1) नरेंद्र भोंडेकर 

2) किशोर जोरगेवार 

3) लता सोनवणे 

4) बच्चू कडू 

5) राजकुमार पटेल 

6) गीता जैन 

7) आशीष जैसवाल 

8) मंजुळा गावीत 

9) चंद्रकांत निंबा पाटील 

10) राजू पाटील 

एकूण - शिवसेना + मिञ पक्ष आणि अपक्ष = 38+ 10 = 48

महायुती एकूण आमदार - 201

महायुतीला आपले नऊ उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी सहा मतांची गरज पडणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांवर महायुती या सगळ्यासाठी अवलंबून असेल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Mahayuti vs Mahavikas Aaghadi : महायुती अन् महाविकास आघाडीची पाऊले चालती हॉटेलची वाट; दगाफटका टाळण्यासाठी आमदारांची बडदास्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024  : ABP MajhaSanjay Shirsat on Eknath shinde :  गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाटGulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंयRaosaheb Danve on CM Maharashtra :  मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
Embed widget