एक्स्प्लोर

Mahayuti vs Mahavikas Aaghadi : महायुती अन् महाविकास आघाडीची पाऊले चालती हॉटेलची वाट; दगाफटका टाळण्यासाठी आमदारांची बडदास्त

Mahayuti vs Mahavikas Aaghadi, Vidhan Parishad Elcection : महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय हॉटेलवारीला सुरुवात झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे.

Mahayuti vs Mahavikas Aaghadi, Vidhan Parishad Elcection : महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय हॉटेलवारीला सुरुवात झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Elcection) तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह (Uddhav Thackeray Shivsena) अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (Ajit Pawar NCP) आणि भाजपने (BJP) मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीने आणि महायुतीने विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Elcection) तोंडावर  असल्याने सावध पवित्रा घेतला आहे. ठाकरेंचे सर्व आमदार निवडणुकीदरम्यान हॅाटेलवर राहणार आहेत. 10,11 आणि 12  जुलै रोजी ठाकरेंचे 16 आमदार हॅाटेलवर मुक्कामी असणार आहेत. त्याचदरम्यान उद्धाव ठाकरे हॅाटेलमध्ये गाठीभेटी घेणार आहेत. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. याशिवाय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि भाजपचे आमदार देखील हॉटेलवर मुक्कामी जाणार असल्याची माहिती आहे. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादी आमदारांसाठी हॉटेल बुक करणार 

विधानपरिषद निवडणुकीला मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांसाठी हॉटेल बुक करणार आहे. 12 जुलै रोजी विधानसभेच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद निवडणुकीसाठी 2 उमेदवार तसेच पक्षासाठी स्वतःची हक्काची 43 मतं आहेत. अजूनही राष्ट्रवादीला 2 उमेदवारांसाठीचा मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी 3 मतांची गरज भासणार आहे. सध्या विधान परिषद निवडणुकीला उमेदवार निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित झाला आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून खबरदारी

उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर भाजपने देखील सावध पाऊलं उचलली आहेत. भाजपाच्या सर्व आमदाराना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार, असल्याची माहिती आहे. 

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात 

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक लागली आहे. मात्र, 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडी असू देत किंवा मग महायुती दोन्हीकडून मतांची जुळवा जुळवा करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे एक मोठा आव्हान वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे. मतांची जुळवाजवळ नेमकी कशी केली जाणार? कोणाला किती मतं  मिळणार? अपक्ष आमदारांचा नेमका रोल किती आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी काही पक्ष आपल्या आमदारांना हॉटेलवर मुक्कामी ठेवणार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Maharashtra Politics : शिंदेसेनेची ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेची मोठी खेळी; विदर्भातील 'या' दिग्गज नेत्यांचे राजकीय पुनर्वसन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
Rajya Sabha Election 2026: लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?

व्हिडीओ

CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
Iran Vs America Special Report : इराणचा पलटवार, पश्चिम आशियात हाहाकार, कतारमधील तळ इराणचं लक्ष्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
Embed widget