एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधरमधून मनसेचे अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार? निरंजन डावखरेंचा पत्ता कट?

Abhijit Panse: महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी मनसे नेते अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर, पण अभिजीत पानसे नेमके मनसेचे उमेदवार की, महायुतीचे असा प्रश्न उपस्थित होतोय.

Vidhan Parishad Election 2024 : मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sena) कोकण पदवीधरसाठी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

मनसेनं केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे."

अभिजीत पानसेंना कोकण पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर, पण मनसेची की, महायुतीची? 

कोकण पदवीधरमधून मनसेने अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली. मात्र, आता पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची? असा सवाल उपस्थित झाला आहे. कोकण पदवीधरमधून डावखरे हे भाजपचे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपतोय आणि त्याच जागेवर मनसेकडून अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ही उमेदवारी मनसेची की महायुतीची? असा सवाल उपस्थित झाला आहे. कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.  

अभिजीत पानसे कोण? 

मनसे नेते अभिजीत पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत. 2014 मध्ये पानसेंनी दिग्दर्शित केलेल्या रेगे चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाची निर्मिती खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावेळी बाळासाहेबांचं आयुष्य रुपेरी पडद्यावर साकार करण्यासाठी संजय राऊतांनी अभिजीत पानसेंची निवड केली. अभिजीत पानसे दिग्दर्शित ठाकरे सिनेमा महाराष्ट्रासह देश-विदेशात प्रचंड गाजला. शिवसेनेत असताना भारतीय विद्यर्थी सेनेची धुरा अभिजीत पानसे यांच्या खांद्यावर होती. मात्र, नंतर आदित्य ठाकरेंच्या लॉन्चिंगसाठी बाळासाहेबांकडून युवासेना स्थापन करण्यात आली आणि शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचं विलीनीकरण युवासेनेत झालं. मग नाराज पानसे यांनी मनसेची साथ देण्याचा निर्णय घेतला. अभिजित पानसे सिनेमाव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय असतात. पानसे यांनी मनसेच्या चित्रपट सेनेची जबाबदारी सांभाळलेली आहे. राज ठाकरेंच्या निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. अभिजीत पानसे यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूकही लढवली होती. 

पाहा व्हिडीओ : Abhijeet Panse Is MNS Candidate : कोकण पदवीधरमधून मनसेची अभिजीत पानसेंची उमेदवारी : ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Dhananjay Munde : मंत्रिमंडळाचा विस्तार ते आमदारांचे राजीनामे? धनंजय मुंडे म्हणतात...Zero Hour HIt and Run : नागपूरमध्ये हिट अँड रन, दोघांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमीZero hour Priyanka Gandhi : प्रियांका गांधी वायनाडमधून लढणार, काँग्रेसचा प्लॅन काय?ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 17 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!
Lockie Ferguson: 4 ओव्हर, 4 मेडन, 3 विकेट; लॉकी फर्गुसनंने इतिहास रचला!
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
बचतीचा जबरदस्त फॉर्मुला, लाखोंची सेव्हिंग करणारा 50:30:20 फॉर्मुला नेमका आहे तरी काय? 
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
नाशिक टायटन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश; मुकेश चौधरी, अर्थव काळे चमकले
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
उघड्या वायरने घेतला तिघांचा जीव, वारसांना 4 लाखांची मदत; अजित पवारांकडून कारवाईचेही निर्देश
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
मतमोजणीचा वाद रंगला, आता ठाकरेंच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; रवींद वायकरांची होती तक्रार
मतमोजणीचा वाद रंगला, आता ठाकरेंच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; रवींद वायकरांची होती तक्रार
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
Embed widget