VBA Loksabha Candidate List : मावळ आणि शिरुरची लढत ठरली, मुस्लीम उमेदवारही रिंगणात, वंचितची सातवी यादी जाहीर
VBA 7th List of Loksabha Candidate List : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मावळमधून माधवी जोशी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
VBA 7th List of Loksabha Candidate List : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारांची सातवी यादी (VBA 7th List of Loksabha Candidate List) जाहीर केली. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मावळमधून माधवी जोशी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर शिरुरमधून आफताब अन्वर मकबुल शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितने मावळमध्ये आगरी समाजातील महिलेला तिकिट दिलं आहे, तर शिरुरमध्ये मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे.
वंचितच्या उमेदवारांची कोणाशी लढत ?
मावळमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर बारणेंविरोधात ठाकरे गटाने संजोग वाघेरे यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे वंचितच्या उमेदवार माधवी जोशी यांची लढत बारणे आणि वाघेरे या दोघांशीही असणार आहे. तर शिरुरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने असणार आहे. दरम्यान वंचितने उमेदवार घोषित केल्याने आता शिरुरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. वंचितचे उमेदवार आफताब शेख यांची लढत अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्याशी होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून आफ़ताब अनवर मक़बूल शेख यांना उमेदवारी जाहीर.#VBAForIndia pic.twitter.com/l7oLDrVJT3
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 20, 2024
पाचव्या यादीमध्ये कोणाची नावे?
वंचितकडून आणखी 10 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. रायगड, धाराशिव, नंदुरबार, जळगाव, दिंडोरी, पालघर, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
1. दक्षिण मध्य मुंबईमधून वंचितचे अध्यक्ष अबुल हसन खान - मुस्लीम
2. उत्तर मुंबई - बीना रामकुबेर सिंह उमेदवार - क्षत्रिय
3. धाराशिव - भाऊसाहेब आंधळकर - लिंगायत
4. रायगड - कुमुदानी चव्हाण - मराठा
5. उत्तर पश्चिम मुंबई - संजीव कुलकोरी - ब्राम्हण
6. दिंडोरी - गुलाब बरडे - भिल
7. पालघर - विजया म्हात्रे - मल्हार कोळी -
8. भिवंडी - निलेश सांबरे - हिंदू कुंबी
9. नंदुरबार - हनुमंत सुर्यवंशी - टकरे कोळी
10. जळगाव - प्रफुल्ल लोढा - जैन
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मावळ लोकसभा मतदारसंघातून माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर.#VBAForIndia pic.twitter.com/cTVbUu1Htp
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 20, 2024
इतर महत्वाच्या बातम्या