एक्स्प्लोर

VBA Candidate List : वंचितची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, तृतीयपंथीयास दिली उमेदवारी

वंचितने राज्यातील 11 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Elction)  तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. वंचितने राज्यातील 11 जागांवर उमेदवार दिले आहेत. यात प्रामुख्याने रावेर, नागपूर दक्षिण मध्य, वाशिम, शिंदखेड राजा, शेवगाव, नांदेड दक्षिण या जागांचा समावेश आहे. तर रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यास अद्याप कालावधी आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्याआधीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीने 'आघाडी' घेतली आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या 11  जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. सर्व उमेदवार  विदर्भ-मराठवाड्यातील आहे.  यामध्ये भाजपचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. 

  • रावेर - शमिभा पाटील
  • सिंधखेड राजा - सविता मुंडे 
  • वाशीम - मेघा डोंगरे
  • धामणगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा
  • नागपूर साऊथ वेस्ट -  विनय भांगे
  • डॉ. आविनाश  नन्हे - साकोली
  • फारुख अहमद - दक्षिण नांदेड
  • शिवा नरांगळे -लोहा
  • विकास रावसाहेब दांडगे- औरंगाबाद पूर्व (छत्रपती संभाजीनगर)
  • किसन चव्हाण - शेवगाव
  • संग्राम माने - खानापूर 

ऑक्टोबर 12  पर्यंत निवडणुकीचे नोटिफिकेशन निघेल असं गृहित धरुन चाललो आहे. 15 नोव्हेंबरला मतदान कुठल्याही परिस्थितीत मतदान घ्यावं लागेल आणि निकाल जाहीर करत शपथविधी कार्यक्रम घ्यावं लागेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.  

उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून यादी जाहीर :  प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर म्हणाले,  वेगवेगळ्या ओबीसी संघटना आणि त्याचबरोबर आदिवासी समुहातील राजकीय पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरवण्याचे ठरवले आहे. या आघाडीला अजून आम्ही नाव दिलेलं नाही, पुढे नाव देणार आहोत. काही जणांशी आम्ही बोलतोय, सोबतच काही संघटनांशी बोलतोय . लोकसभा निवडणुकीत आम्ही पाहिलं आहे, पैशाचा महापूर होता. आता महापुराचा महापूर येईल विधानसभेत असं आम्हाला वाटतं. त्यामुळे उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून यादी जाहीर करतोय .  रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, साकोली, लोहा, औरंगाबाद, शेवगाव, अनापूर ही पहिली यादी जाहीर करतो, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.  

हे ही वाचा :

निवडणुकीपूर्वी घड्याळाचा फैसला करा, नाही तर चिन्ह गोठवा, शरद पवारांची सुप्रीम कोर्टात धाव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार
Aaditya Thackeray : महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyach Bola Worli : ठाकरे गड राखणार की इंजिन एंट्री करणार? वरळीकरांच्या मनात नेमकं कोण?ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 11 November 2024Bala Nandgaonkar on Mahim : ..पण अजूनही वेळ गेलेली नाही, बाळा नांदगावकरांचं सर्वात मोठं वक्तव्य!Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : ठाकरे ट्रम्प यांचाही राजीनामा मागू शकतात, ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्तुत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार
Aaditya Thackeray : महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
Maharashtra Assembly Elections 2024 : शिंदेंची सभा रद्द होताच ब्लड प्रेशर वाढलेला उमेदवार व्हीलचेअरवर बसून मतदारसंघात, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
शिंदेंची सभा रद्द होताच ब्लड प्रेशर वाढलेला उमेदवार व्हीलचेअरवर बसून मतदारसंघात, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Uddhav Thackeray on Dhananja Mahadik : कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? धमकीवरून उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार
कोल्हापूरचा मस्तवाल, मुन्ना महाडिक, मुन्ना तुझ्या काय बापाचं पैसे दतोस का? उद्धव ठाकरेंचा घणाघाती प्रहार
बॅग तपासणे पोलिसांचा अधिकार, इश्यू करण्याची गरज नाही; संतापलेल्या ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
बॅग तपासणे पोलिसांचा अधिकार, इश्यू करण्याची गरज नाही; संतापलेल्या ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Uddhav Thackeray Bag Check : बॅगच काय, युरिन पॉट पण तपासा, उद्धव ठाकरे भडकले
Embed widget