एक्स्प्लोर

Dasara Melava 2022 Live Updates : ही गर्दी पाहून खरी शिवसेना कुठं आहे याचं उत्तर उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला मिळालं आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Dasara Melava 2022 Live Updates : शिवसेनेतील फुटीनंतर होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी तोफा धडाडणार आहेत.

LIVE

Key Events
Dasara Melava 2022 Live Updates : ही गर्दी पाहून खरी शिवसेना कुठं आहे याचं उत्तर उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला मिळालं आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Background

Dasara Melava 2022 Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेपासून (Shivsena) फारकत घेत भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर आज होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आज दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडणार आहेत. याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.

दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडणार, राज्याचं लक्ष
उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. हा वाद कोर्टात असला तरी दोन्ही नेत्यांमध्ये दसऱ्या मेळाव्यात आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार? कुणावर टीका करणार? भाषणामध्ये कळीचा मुद्दा कोणता असणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.  

दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात होईल. शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे- कुर्ला संकुलात होणार आहे. गर्दी जमविण्यासाठी उभय बाजूने संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे.एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला जात आहे. दोन्हीकडे मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. बीकेसी मैदानावर दोन ते तीन लाख कार्यकर्ते जमतील असा दावा, शिंदे गटाकडून केला जात आहे. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे यांच्याकडून तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरातून मेळाव्यासाठी कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही तयारी केली आहे. 

या मुद्द्यांवर बोलणार?
उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा प्रमुख विषय शिंदे गट आणि भाजपवर असेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवरही टीका होण्याचे संकेत आहेत. तसेच विविध मुद्द्यांवरून केंद्राला धारेवर धरले जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

जास्तीतजास्त कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे आवाहन 
राज्यभरातून चार-पाच हजार एसटी, खासगी बसगाडय़ा आणि हजारो खासगी वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. मैदानात लाखभराहून अधिक खुर्च्याची व्यवस्था असून, आणखी हजारो कार्यकर्ते बाजूच्या मैदानांवर आणि परिसरात असतील. त्यांच्या खाण्यापिण्याची, वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही गटांनी दसरा मेळावा यशस्वी व्हावा, यासाठी जास्तीतजास्त कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे.

21:52 PM (IST)  •  05 Oct 2022

Dasara Melava 2022 Live Updates : मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

Dasara Melava 2022 Live Updates : काहींनी मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवलं. पण आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

21:45 PM (IST)  •  05 Oct 2022

Dasara Melava 2022 Live Updates : 'तुम्हाला लाज नाही का वाटली मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला?' : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

21:36 PM (IST)  •  05 Oct 2022

Dasara Melava 2022 Live Updates : 'नवी मुंबई विमानतळाला तुम्हीच बाळासाहेबांचं नाव द्यायला सांगितलं, दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या बैठकीतून तुम्ही निघून गेलात' : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

21:35 PM (IST)  •  05 Oct 2022

Dasara Melava 2022 Live Updates : 'दाऊदचा हस्तक होण्याऐवजी मी मोदींचा हस्तक होणं पसंत करेन' : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

21:26 PM (IST)  •  05 Oct 2022

Dasara Melava 2022 Live Updates : 'उद्धव ठाकरेंनी वर्क फॉर्म होम केलं, आम्ही वर्क विदाऊट होम केलं, सातच्या आत घरी जाण्याची शिवसैनिकांची संस्कृती नाही' : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget