Raju Parwe: दोन दिवसांपूर्वी फडणवीसांची भेट, आज शिंदे गटात प्रवेश? आमदार राजू पारवे शिवसेनेच्या वाटेवर
Raju Parwe: उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यताराजू पारवे हे धनुष्यबाण चिन्हांवर रामटेक मधून निवडणूक लढवण्याची शक्यता
![Raju Parwe: दोन दिवसांपूर्वी फडणवीसांची भेट, आज शिंदे गटात प्रवेश? आमदार राजू पारवे शिवसेनेच्या वाटेवर Umred MLA Raju Parve two days ago meeting with Devendra Fadnavis now joining Eknath Shinde Group Shiv Sena Maharashtra Politics Marathi News Raju Parwe: दोन दिवसांपूर्वी फडणवीसांची भेट, आज शिंदे गटात प्रवेश? आमदार राजू पारवे शिवसेनेच्या वाटेवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/18/9a0021ed7c1eb269877e61e7b751d89e171073703429388_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Umred Lok Sabha Election 2024 : नागपूर : उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. राजू पारवे हे धनुष्यबाण चिन्हांवर रामटेकमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. रामटेकची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे काँग्रेस आमदार पारवे भाजपमध्ये जाणार आणि त्यांना भाजपकडून रामटेक लोकसभेची उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेली पारवे-फडणवीस यांची भेट महत्वाची मानली जात होती. अशातच आता राजू पारवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
राजू पारवेंचा आजच शिवसेनेत प्रवेश
आजच राजू पारवे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजू पारवे धनुष्यबाण चिन्हांवर रामटेकमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. रामटेक ही लोकसभा शिवसेनेच्या कोट्यात गेली आहे, त्यामुळे राजू पारवेंनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, रामटेक हा मतदार संघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे. सध्या येथे शिवसेनेचे कृपाल तुमाने खासदार आहेत. महायुतीच्या जागा वाटपात भाजपला ही जागा हवी आहे. पण अद्याप निर्णय झालेला नाही. हा निर्णय झाल्यानंतर राजू पारवे भाजप प्रवेशाचा निर्णय घेतील. तो पर्यत भेटीगाठी होत राहतील, असे सांगितले जाते.
पाहा व्हिडीओ : Raju Parwe : राजू पारवे आज शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)