एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर

मी सर्वांचा आभारी आहे, मला देण्यात आलेली ही मोठी जबाबदारी आहे. पण, राजकीय क्षेत्राचा मला अनुभव नाही. देशहिताचे खटले लढणे आणि लोकांना विश्वास देण्याचे काम मी आजपर्यंत केले आहे.

मुंबई : भाजपाकडून मुंबईतील आणखी एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. मुंबई उत्तर-मध्य (North Central Mumbai) लोकसभा मतदारसंघात भाजपने (BJP Lok Sabha Election) नवाच चेहरा मैदानात उतरवला आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर करुन सर्वानाच धक्का दिलाय. त्यामुळे आता या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम (ujjwal nikam vs varsha gaikwad ) अशी लढत रंगणार आहे. भाजपाकडून तिकीट जाहीर झाल्यानंतर उज्जल निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत, आपण आपला मूळ स्वभाव कधीही बदलणार नसल्याचे स्पष्ट केले. 

मी सर्वांचा आभारी आहे, मला देण्यात आलेली ही मोठी जबाबदारी आहे. पण, राजकीय क्षेत्राचा मला अनुभव नाही. देशहिताचे खटले लढणे आणि लोकांना विश्वास देण्याचे काम मी आजपर्यंत केले आहे. भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्याचे काम भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचे सांगत उमेदवारी जाहीर केल्याबद्दल नरेद्र मोदींसह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे उज्जल निकम यांनी आभारही मानले. तर, देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमत्व कसे अबाधित राहील यासाठी आणि लोकशाही सुदृढ करण्याकरता मी काम करेल, असेही निकम यांनी म्हटले. 
 
प्रतिस्पर्धी वर्षा गायकवाड यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, आज संकष्टी आहे, गणपतीचा दिवस आहे. त्यात, हनुमान जयंतीचा माझा जन्म असल्याने मी कधीही कुणाला कमी लेखत नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, सत्यासाठी आणि न्यायाकरिता झगडणं हे माझ्या रक्तात आहे. त्यामुळे, आजपर्यंत गेल्या 40 ते 45 वर्षांच्या कारकिर्दीत मी कुठल्याही आरोपीचं मी प्रतिनिधित्व केलं नाही. याउलट खोट्या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपींना सोडावं, अशी धाडसी भूमिका मी घेतलेली आहे, अशी आठवणही त्यांनी सांगितली. 

राजकीय उत्तर कसं द्यायचं हे शिकणार 

भाजपाचं सरकार आल्यास संविधान बदलणार, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होतो, त्यासंदर्भात निकम यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी उत्तर दिलं. राजकारणात आरोप केल्यानंतर त्यास कसं उत्तर द्यायचं, याची चर्चा आमच्या राजकारणातील धुरंदर लोकांशी चर्चा करेल. त्यातून, कायदेशीर व अशांतता पसरणार नाही, याची ग्वाही मी देतो. राजकारणात स्पष्टवक्तेपणा चालत नाही, पण मी माझा निर्भीड व निस्पृह स्वभाव सोडणार नाही हे तुम्हाला पुढील काही दिवसांत कळेल, असेही निकम यांनी म्हटले.

पूनम महाजन यांच्याशी चर्चा करणार

पूनमताई या मला नवीन नाहीत, प्रमोद महाजन यांचा खटला लढताना मला त्या सातत्याने भेटत असत. त्यामुळे, या मतदारसंघातील त्यांच्या गेल्या 10 वर्षांच्या अनुभवावरआधारित त्यांच्याशी मी चर्चा करेल, या मतदारसंघातील प्रश्नांवरही चर्चा करेल, असे म्हणत पूनम महाजन यांच्या उमेदवारीवरही निकम यांनी भाष्य केलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Embed widget