Uddhav Thackeray vs BJP : हिंदुत्वाला धोका कुणी दिला, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांच्या 'मातोश्री' भेटीनंतर ठाकरे वि भाजपचं राजकारण पेटलं!
Uddhav Thackeray vs BJP : शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठाला सोहळ्याला विरोध केला होता. राम मंदिर पूर्ण झाले नसताना प्राणप्रतिष्ठा करत आहेत, असा आरोप शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर केला होता.
![Uddhav Thackeray vs BJP : हिंदुत्वाला धोका कुणी दिला, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांच्या 'मातोश्री' भेटीनंतर ठाकरे वि भाजपचं राजकारण पेटलं! Uddhav Thackeray vs BJP Who threatened Hindutva after Shankaracharya Avimukteswarananda Matoshri visit Thackeray vs BJP politics ignited Maharashtra Politics Marathi News Uddhav Thackeray vs BJP : हिंदुत्वाला धोका कुणी दिला, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांच्या 'मातोश्री' भेटीनंतर ठाकरे वि भाजपचं राजकारण पेटलं!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/16/4bc3b9fa324f2273075f0bbe88e41b521721125434788924_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Uddhav Thackeray vs BJP : शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठाला सोहळ्याला विरोध केला होता. राम मंदिर पूर्ण झाले नसताना प्राणप्रतिष्ठा करत आहेत, असा आरोप शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर केला होता. आता हेच अविमुक्तेश्वरनंद (Shankaracharya) पुन्हा एकदा चर्चेत आलेत आहेत. याला कारण त्यांनी मातोश्रीवर जात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची भेट घेतली. त्यांनी नुसती भेटच घेतली नाही तर त्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगलीय.
उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही
उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही, शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांचे हे विधान सध्या चर्चेत आहे. मातोश्रीवर आलेल्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांचे मातोश्रीवर आदरातिथ्य उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केलं. यावेळी आदित्य आणि तेजस ठाकरेही होते. मात्र त्यांच्या या आदरातिथ्यानंतर सर्वाधिक चर्चा रंगली ती शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी केलेल्या विधानाची... मागील चार साडेचार वर्षापासून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडत विश्वासघात केला, अशी टीका भाजपच्या प्रत्येक नेत्याकडून केली जाते. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं खुद्द अविमुक्तेश्वरनंद महाराज उभे राहिलेत. उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या विश्वासघातामुळे आम्हाला दु:ख झाले आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसलेले पाहायचे आहे. जोपर्यंत तुम्ही पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत आमच्या हृदयातील वेदना कमी होणार नाही. त्यांच्या विश्वासघाताने आम्ही दु:खी आहोत, असे विधान स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केले. जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही असे विधानही त्यांनी केलेय.
ठाकरेंसोबत विश्वासघात झाला की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विश्वासघात झाला?
शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केल्यानंतर त्यांच्यावर थेट महंतानी टीका करायला सुरुवात केलीय. पंचनाम जूना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ता श्रीशंकराचार्यजी यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला धोका दिल्याचे म्हणत त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे, तर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विश्वासघात झाला? याचा फैसला महाराष्ट्रातील जनता करेल, असे म्हटलंय. शिवाय, हिंदुत्वासोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेशी विश्वासघात केला त्याबद्दल काय म्हणावं? असं म्हणत त्यांनी शंकराचार्यांच्या मातोश्री भेटीवरुन नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी तुम्ही राजकारणा विषयी बोलू नका असे सांगत तो तुमचा विषय नसल्याचे म्हटले आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद महाराज यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. काहींना पोटसुळ उठलाय अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. एकूणच काय याआधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एकमेकांवर टीका करत होते. मात्र आता थेट यामध्ये महंतानीच उडी घेतल्याने नवा ट्विस्ट निर्माण झालाय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्वाचे ही ठिणगी कुठवर पोहोचते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही : ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)