Sanjay Raut Vs Narendra Modi : जॉनी लिव्हरनंतर गुजरातचा लिव्हर आमचं मनोरंजन करतोय, संजय राऊतांची मोदींवर थेट टीका!
संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांची जॉनी लिव्हरशी तुलना केली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे लवकरच मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दौऱ्यावर त्यांच्या या दौऱ्याला फार महत्त्व आले आहे. दरम्यान याच दौऱ्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Uddhav Thackeray Shivsena) नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. राऊतांनी मोदी यांची विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरशी (Johnny Lever) तुलना केली आहे. मोदी हे गुजरातचे जॉनी लिव्हर आहेत, असं राऊत म्हणालेत.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
आज एका रॅलीत मोदी म्हणाले की आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही. मोदी हा सर्वांत मोठा विनोद रोजच करतात. जॉनी लिव्हर यांच्यानंतर जर कोणी आमचं मनोरंजन करत असेल तर ते गुजरातचे लिव्हर आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
भाजपत रोज 5 भ्रष्टाचाऱ्यांचा प्रवेश होतो
आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, असं मोदी सभांमध्ये सांगत आहेत. मात्र त्याच सभेत त्यांच्या आजूबाजूला 10 भ्रष्टाचारी नेते बसलेले असतात. त्यांच्या पक्षात दररोज सरासरी 5 भ्रष्टाचारी लोकांचा प्रवेश होते. हे सर्व लोक अट्टल भ्रष्टाचार असतात. मोदी या भ्रष्ट लोकांचं काय करणार. हे भ्रष्ट लोक मोदींच्या आजूबाजूला फिरता. त्यांच्या गुन्ह्यांच्या फाईली बंद केल्या जातात. या देशात भाजप हा पक्षच सर्वांत मोठा भ्रष्टाचारी आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.
...तर निवडणूक आयोगाने पैसे वसूल करायला हवेत
नरेंद्र मोदी आता देशाचे प्रधानमंत्री नाहीत. निवडणुकीची घोषणा झाल्यावर राज्यात आणि देशा मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान हे कार्यवाहक असतात. त्यामुळे सरकारी यंत्रणाचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही. सरकारी विमान आणि फौजफाटा घेऊन गेल्यास निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून पैसे वसूल केले पाहिजेत. त्यांचा एक एक दौरा हा 25-25 कोटींचा असतो. आचारसंहिता ही केवळ विरोधी पक्षासाठी आहे का? असा सवालही राऊत यांनी केला.
आता जागावाटपाची चर्चा आमच्याकडून बंद!
नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जागावाटपावरची चर्चा बंद झाली पाहिजे. महाराष्ट्रात ही चर्चा आता बंद झाली आहे. चर्चा करायचीच असेल तर आगामी विधानसभा किंवा मग 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीची आम्ही चर्चा करू, असं संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
हे ही वाचा>>
























