एक्स्प्लोर

"उद्धव ठाकरे 'मॅन ऑफ द सिरीज', महाविकास आघाडीच्या 30 ते 35 जागा निवडून येणार"

Sanjay Jadhav on Uddhav Thackeray and Mahavikas Aaghadi  : लोकसभा निवडणुकीची लढाई उद्धव ठाकरे विरुद्ध महायुती अशी होती. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या कर्तुत्वातून लढाई लढली. शिवाय शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनीही चांगला प्रचार केला.

Sanjay Jadhav on Uddhav Thackeray and Mahavikas Aaghadi  : "लोकसभा निवडणुकीची लढाई उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध महायुती (Mahayuti) अशी होती. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या कर्तुत्वातून लढाई लढली. शिवाय शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेत्यांनीही चांगला प्रचार केला. येत्या 4 तारखेला निकाल लागेल. तेव्हा उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरीज असतील. महविकास आघाडीच्या किमान 30 ते 35 जागा निवडून येतील. महायुतीच्या किती येतील मला माहिती नाही. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) निवडून येईल, हे मी आत्मविश्वासाने सांगतो" असे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav) म्हणाले. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते.  

ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी 

संजय जाधव म्हणाले, ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात. वर्षानुवर्षे आपण एकाच ठिकाणी राहतोय. निवडणुकीमुळे एवढा वाद होण्याचे कारण नाही. वैचारीक लढाई असली पाहिजे, ती जातीवर गेली. भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मी ओबीसी आहे. संविधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तींनी अशी वक्तव्य करणे लोकशाहीसाठी घातक होती, असंही जाधव यांनी सांगितले. 

मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी असा प्रयत्न केला तर बिघडण्याचे कारण काय? 

पुढे बोलतना  संजय जाधव म्हणाले, आत्तापर्यंत छगन भुजबळ साहेबांनी ओबीसींसाठी लढा दिला. महादेव जानकर , गोपीचंद पडळकर आणि प्रकाश अण्णा शेंडगे देखील ओबीसींसाठी लढले. सर्व समाजांनी स्वत:च्या समाजासाठी रस्तावर उतरुन लढा दिला आहे. समाजाने सरकारला दबावाखाली आणून अनेक गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामध्ये मग मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी असा प्रयत्न केला तर बिघडण्याचे कारण काय? वाईट वाटायचे कारण काय? प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे, असे अनेक सवाल संजय जाधव यांनी उपस्थित केले. 

जातीवर आधारित आरक्षण नको तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्या

 समाजाला काही पदरात पाडून घ्यायचे असेल तर रस्त्यावर उतरावे लागेल. मराठा समाज रस्त्यावर उतरला म्हणून दोषी आहे का? आमच्या समाजाने हक्क मागू नयेत का? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे ही मागणी चुकीची आहे का? सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा म्हणणे हे चुकीचे आहे का? सरकार सगेसोयऱ्याची अंमलबजावणी कशामुळे करत नाही? मराठा समाजात आज चूल पेटण्याचे वांदे आहेत. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती की, जातीवर आधारित आरक्षण नको तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्या. ती परिस्थिती आज झालेली आहे. आम्ही कोणाचे हक्क हेरावून घेत नाहीत, पण आम्हालाही हक्क मिळाले पाहिजेत, असेही संजय जाधव म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Narendra Modi : लहानपणापासूनच शिव्या शाप वाट्याला, दुकानात थंड चहामुळे लोक कानाखाली मारायचे : नरेंद्र मोदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget