Exclusive: उद्धव ठाकरे हे कर्तृत्ववान व्यक्ती, त्यांच्याकडे पुन्हा सत्ता येईल: शत्रुघ्न सिन्हा
Shatrughan Sinha: तृणमूल काँग्रेसचे (TMC) लोकसभा सदस्य शत्रुघ्न सिन्हा यांनी एबीपी न्यूजशी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी राष्ट्रपती निवडणूक, महाराष्ट्रातील राजकीय संकट अशा अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली.
Shatrughan Sinha: तृणमूल काँग्रेसचे (TMC) लोकसभा सदस्य शत्रुघ्न सिन्हा यांनी एबीपी न्यूजशी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी राष्ट्रपती निवडणूक, महाराष्ट्रातील राजकीय संकट अशा अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ''उद्धव ठाकरे हे अतिशय कणखर आणि सक्षम व्यक्ती आहेत. त्यांचे जे संगोपन झाले आहे, त्यातून मला दिसते की त्यांना सत्तेचा मोह नाही आहे.''
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे कधीही सत्तेच्या मागे धावले नाहीत, तसेच उद्धव ठाकरेही आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा सत्ता येणार, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी एकी आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी दुसऱ्या पक्षाचा नेता आहे. इतर कोणत्याही पक्षाच्या अंतर्गत बाबीत बोलू नये. मात्र मला वाटतं की, इथेही खेला झाला आहे. इथे जो तमाशा सुरू आहे, तो वेगवेगळे लोक करत आहेत. या प्रकरणात सूत्रधार कोण आहे, त्या पक्षाचे नाव मला घ्यायचे नाही.
राष्ट्रपती निवडणुकीवर काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. शत्रुघ्न सिन्हा यशवंत सिन्हा यांना आपला मोठा भाऊ मानतात. ते म्हणाले की, यशवंत सिन्हा हे तगडे उमेदवार आहेत. जे लोक या निवडणुकीला औपचारिकता म्हणत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की यशवंत सिन्हा हे देशाचे अर्थमंत्री राहिले आहेत, ते एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. निवडणुकीत अजून बरेच काही व्हायचे बाकी आहे. यशवंत सिन्हा यांच्या प्रचाराबाबत ते म्हणाले की, ते माझे मोठे भाऊ आहेत, मी त्यांचा मोठा चाहता आहे, त्यांच्यासाठी मी काहीही करू शकतो आणि मी त्यांचा प्रचार करेन. भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांची पहिली आदिवासी अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्याच्या प्रश्नावर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मी याचे स्वागत करतो. आदिवासी समाज पुढे यावा असे कोणाला वाटणार नाही? आदिवासी आणि दलित समाजाला पुढे आणले पाहिजे.