एक्स्प्लोर

Sanjay Raut BMC Mayor 2026: मुंबईच्या महापौरपदावरुन ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा?; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Sanjay Raut BMC Mayor 2026: मुंबईच्या महापौरपदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बोलणी सुरु असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Sanjay Raut BMC Mayor 2026 मुंबई: मुंबईच्या महापौरपदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात बोलणी सुरु असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. महापौरपदाच्या निवडणुकीवेळी ठाकरेंचे 65 नगरसेवक गैरहजर राहणार असल्याचं बोललं जात आहे. यासाठी ठाकरे-भाजपात बोलणी सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Mumbai Municipal Corporation Election Result 2026)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली नाही. ठाकरे-भाजपात बोलणी सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सगळ्या वृत्तपत्रातील बातम्या आहेत. आम्ही सूत्रांवर विश्वास ठेवत नाही, असं संजय राऊत म्हणाले. कुणाला महापौर करायचं हे भाजप आणि गौतम अदानी ठरवतील, असंही संजय राऊतांनी सांगितले. ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिले आहेत. त्यानूसार भाजप कितीही विजय करत असला तरीही त्यांचा विजय झाला नाही, असंही संजय राऊतांनी सांगितले. एकनाथ शिंदेंना महापौरपदासाठी दिल्लीतून चावी लावली जात आहे. मुंबईत भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांचा महापौर होऊ नये, यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत, असा दावाही संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला. (Devendra Fadnavis Eknath Shinde Yuti)

महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहणार असल्याची चर्चा- (Shivsena UBT BMC Election 2026)

महापौरपदाच्या निवडणुकीवेळी ठाकरेंचे 65 नगरसेवक गैरहजर राहणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक गैरहजर राहिल्यास निवडणूक बिनविरोध होईल. त्यामुळे मुंबई महापालिकेत 2017 सालाची भरपाई ठाकरे भाजपला करुन देणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी अशी ठाकरे गटासोबत अशी कोणतीही चर्चा सुरु नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. 2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतली होती. अशातच, महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहणार असल्याची चर्चा सुरु आहे.  2017 सारखीच रणनीती आताही असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपने 2017 साली ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होणार नाही, असा निर्णय घेतला होता. पहारेकऱ्याची भूमिकेत भाजप होतं. तसेच भाजपने विरोधी पक्षनेते पद न घेतल्याने, मग काँग्रेसला ते विरोधी पक्षनेते पद गेले.

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप - 89
शिवसेना ठाकरे गट - 65
शिवसेना - 29
काँग्रेस - 24 
मनसे - 6 
एमआयएम- 8 
एनसीपी - 3 
एसपी - 2 
एनसीपी शप - 1 
————-
एकूण- 227

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये पडद्यामागे चर्चा?, VIDEO:

संबंधित बातमी:

Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget