एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

उद्धव ठाकरे यांच्याकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर

Uddhav Thackeray, Sangli : "औरंगजेबाची वृत्ती तुम्हाला का म्हणायच नाही? औरंगजेबाने मराठ्यांबाबत लिहून ठेवलं होतं.

Uddhav Thackeray, Sangli : "चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो. चंद्रहार दिल्लीत जाणार आहे. मर्द दिला आहे, त्याला जिंकून देण्याचा मर्द पणा दाखवा", असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. आम्ही भाजपला सोडलं हिंदूत्व सोडलं नाही. दुसऱ्या धर्माचा द्वेष करणे हे छत्रपतींनी शिकवलं नाही. महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न कराल, तर औरंगजेब वृत्तीला मुठमाती दिल्याशिवाय राहणार नाही", असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. सांगली येथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 

ईडी, इनकम टॅक्स भाजपचे घरगडी झाले

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ईडी, इनकम टॅक्स भाजपचे घरगडी झाले असले तरी माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. अजित पवारांना पक्षाचं चिन्ह वापरताना खाली सूचना द्यायला सांगण्यात आली आहे. सिगारेटच्या पाकिटावर सावधानतेचा इशारा दिला जातो. तशाच प्रकारे अजित पवारांना न्यायालय निकाल देत नाही तोवर तसेच लिहावे लागणार आहे. भाजपची परिस्थिती कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी झाली आहे.

शिवसेनेनं पेरलेल्या बियांचा आता वटवृक्ष झाला आहे

पुढे बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, शिवसेनेनं पेरलेल्या बियांचा आता वटवृक्ष झाला आहे. भाजपच्या बियांना अंकुर देखील फुटला नाही. जो माणूस मातीत खेळतो तो मातीशी बेईमानी करत नाही. काही माणसं ओळखण्यात माझी चूक झाली. काय दिलं नव्हतं म्हणून खाऊन खाऊन पचन झालं नाही म्हणून पळून गेले. शिवसेना नसती तर हे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची ओळख महाराष्ट्राला झाली असती का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. 

 शिवसेनेने किंवा काँग्रेसने कधीही सुडाचे राजकारण केले नाही

आज या मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दम दिला आहे. तुमच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. आता निवडणुकीनंतर कुंडली आणि पोपट घेऊन झाडाखाली बसण्याचे काम आहे. कोल्हापुरात जाऊन शाहू महाराज यांची भेट घेतली. तिथे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. शिवसेनेने किंवा काँग्रेसने कधीही सुडाचे राजकारण केले नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकांवर टीका करायचे पण सुडाने वागले नाहीत, असंही ठाकरेंनी (Uddhav Thackeray)
 नमूद केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Arvind Kejriwal | दिल्लीतून मोठी अपडेट! ईडीची टीम मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी धडकली

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget