एक्स्प्लोर

बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप

Badlapur Case : बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे असल्याचा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

Uddhav Thackeray On Badlapur Case : बदलापूर : बदलापुरात दोन निरागस चिमुकल्यांवर एका नराधमानं अत्याचार केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरात बंदची हाक देण्यात आली होती. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सर्व आंदोलक शाळेबाहेर एकत्र जमले आणि आंदोलनाला सुरुवात झाली. आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात जाऊन रेलरोको सुरू केला. मध्य रेल्वेवरील कल्याण-कर्जत आणि अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असून यामुळे कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले खरे, पण आंदोलकांचं रौंद्ररुप अनुभवायला मिळालं. याच प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे. बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे असल्याचा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, देशाच्या अनेक भागांत अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत. मात्र, काही राज्यात अशा घटना घडल्या तर त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो, असा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. मला वाटतं की, आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी योजना राबवतोच, पण त्याचबरोबर त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपण फक्त काही राज्यांनाच टार्गेट करून चालणार नाही, तर देशाच्या प्रत्येक भागांत आपल्या मुलींचं रक्षण केलं पाहिजे आणि आरोपींवर त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर कायदे करून कारवाई झाली पाहिजे. तसेच, बदलापूरची शाळा भाजपच्या कोणत्या तरी कार्यकर्त्यांची असल्याचं मला समजलं. मात्र, त्यात राजकारण आणण्याचा माझा हेतू नाही. थोरात कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलंच पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

पोर्शे अपघातातील आरोपीप्रमाणे या नराधमालाही निबंध लिहायला सांगणार का? : उद्धव ठाकरे 

"वरळीतील हिट अँड रन आरोपी मिहीर शाह अटकेत आहे. त्यांनी पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीला निबंध लिहायला सांगितला असावा. त्याचप्रमाणे ते या नराधमाला निबंध लिहून सोडायला सांगणार आहेत का? कठोर कारवाई व्हायला हवी आणि न्याय प्रलंबित प्रक्रियेत अशी प्रकरणं गायब होणं परवडणारं नाही. तेव्हाच आपण म्हणू शकतो की, आपल्या लाडकी बहन आणि मुलींबद्दल आपल्याला आदर आहे.", असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

दिल्लीत काही वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण घडलं होतं. या नराधमाला फासावर लटकवायला इतका वेळ लागला. अशा जघन्य प्रकरणांमध्ये न्याय प्रक्रियेला विलंब करणाऱ्यांना जबाबदार धरायला हवं. हाथरस, उन्नव, राजस्थान किंवा आता बदलापूरमध्येही प्रत्येक रेपिस्टला फाशी झाली पाहिजे आणि आमच्या मुलींना संरक्षण मिळाले पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

आम्ही आमच्या कार्यकाळात शक्ती विधेयक आणणार होतो. विधेयकाचा मसुदा तयार होता. त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन कोरोनामुळे दोन ते तीन दिवसांचं झालं होतं. त्यामुळे आमचं सरकार गद्दारांनी पाडलं म्हणून आम्ही हे विधेयक आणू शकलो नाही. आता त्यांनी हे विधेयक रखडवलं आहे. हे विधेयक मांडून या नराधमांना शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : मेलबर्न कसोटीतही भारतीय फलंदाजांची नांगी, भारताची दुसऱ्या दिवसअखेर 5 बाद 164 अशी अवस्थाZero Hour : आर्थिक सुधारणांचे शिल्पकार Manmohan Singh यांची कारकीर्दZero Hour : पालकमंत्री तुम्हालाच लखलाभ, बीडच्या पालकमंत्रिपदावरून मुंडे विरुद्ध धसVinod Kambli Health Update| त्यांच्यामुळं मी जिवंत आहे, तब्येतील सुधारणा; विनोद कांबळी रडले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Rohit Sharma : तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
Embed widget