एक्स्प्लोर

एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले

मी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून आलो कारण दोन तीन दिवसात जे काही झालं त्यामुळे माझा मूड गेला.

पुणे : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षातील काही आमदार नाराज झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात आपणास संधी मिळेल अशी आशा असतानाही अनेकांना डावलण्यात आल्याने काहींनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामध्ये, शिवसेना (Shivsena) शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे असून माजी मंत्री तानाजी सावंत, विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनीही थेट नाराजी दर्शवली. विशेष म्हणजे विजय शिवतारे यांनी परखड शब्दात आपली भूमिका मांडली होती. मात्र, 5 दिवसानंतर त्यांची नाराजी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मी नाराज नव्हतो, एकनाथ शिंदे यांचा विश्वासू सहकारी हे पद मला जास्त जवळचे आहे, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटातील नाराज आमदार विजय शिवतारे यांनी भूमिका स्पष्ट केली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या विजय शिवतारेंचे सूर 5 दिवसांतच बदलल्याचं पाहायला मिळालं. 

नागपूरमधील विधिमंडळाचे अधिवेशन सोडून विजय शिवतारे मतदारसंघात परतले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून आलो कारण दोन तीन दिवसात जे काही झालं त्यामुळे माझा मूड गेला. पात्रता असताना देखील डावले गेलं, डावलण्यामागे एकनाथ शिंदे यांची करणे असतील. मला मंत्री पद का नाकारले मला माहित नाही, पण ठीक हे आहे कुटुंबातील प्रश्न आहे. तो आम्ही बघू मात्र मी नाराज झालो होतो. मंत्रिपद मिळेल म्हणून कुटुंबातील सगळे लोकं नागपुरात आले. एखादा माणूस निधन झाल्यावर जसा मातंग होतो तसा मातंग झाला, त्यामुळे मी अस्वस्थ होतो. कार्यकर्ते गाड्या घेऊन आले होते, त्यांचा अपेक्षाभंग झाला. कॅपिसिटी होती म्हणून वाटत होते मंत्रिपद मिळेल, पण तसे झालं नाही. मंत्री पद मिळणार नाही हे दोन दिवसापूर्वी मला सांगितले असते तर शांत राहिलो असतो, उलट मी थांबून दुसऱ्याला मंत्रिपद दिले असते, अशा शब्दात विजय शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र,  

मला मंत्रिपद मिळेल, अशी माझ्या घरच्यांना अपेक्षा होती. शपथविधी सोहळ्यासाठी 375 गाड्या तब्बल दहा तासांचा प्रवास करून नागपूरला आल्या होत्या, कार्यकर्ते देखील खूपच आग्रही होते. मात्र, मंत्रि‍पदाची संधी न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी मी थोडा भावूक झालो आणि अनेक गोष्टी बोलून गेलो. पण माझ्या मनात असे काही नाही, पुढील काळात एकनाथ शिंदे जे पद देतील ते मला मान्य असेल, अशा शब्दात विजय शिवतारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे, गेल्या 4 दिवसांपासून त्यांची असलेली नाराजी दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

प्रकाश सुर्वेंची देखील नाराजी दूर  

राज्यातील महायुतीच्या सरकारच्या मंत्रिपदाचे वाटप झाल्यानंतर ज्यांनी उघडपणे आपली नाराची व्यक्त केली होती, त्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी देखील मी नाराज नव्हतोच असे आज सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात नक्कीच चांगली संधी देतील, हा एक परिवार आहे, मी थोडासा दुःखी होतो. घरी आईची तब्येत ठीक नसल्याने आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी मुंबईला परतलो होतो, असे प्रकाश सुर्वे यांनी म्हटले आहे. 

सगळ्या आमदारांची नाराजी दूर

सगळ्या आमदारांची नाराजी आता दूर झाली आहे, अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला त्यांना देखील मान्य आहे. आम्हाला देखील राजीनामा देण्यास सांगितला तर आम्ही लगेच देऊन टाकू, असे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले. तसेच, खातेवाटप आज किंवा उद्या जाहीर केले जाईल असे मला वाटते, काही अडलं नसून सर्व फायनल झालेले आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी म्हटले. 

हेही वाचा

भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
भिवंडीत राजकीय घडामोडींना वेग, भाजपच्या नगरसेवकांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकं प्रकरण काय?
भिवंडीत राजकीय घडामोडींना वेग, भाजपच्या नगरसेवकांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकं प्रकरण काय?
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला

व्हिडीओ

Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 WC 2026 Ind vs Ned Abhishek Sharma: आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
Shiv Jayanti 2026 : आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा..., देशभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी, आकर्षक सजावट, Photos
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा..., देशभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी, आकर्षक सजावट, Photos
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांच्या सहभागानं अजिंक्यतारा उजळला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अजिंक्यताऱ्यावर मशाल महोत्सव, हजारो मावळ्यांची हजेरी
Raj Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
एकनाथ शिंदेंसोबत दिलखुलास गप्प, राज ठाकरेंचं नंदनवन बंगल्यात बारीक निरीक्षण, सांगितली आठवण
Vijay Mallya : विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं, भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही म्हणाला, कोर्टात नवा कांगावा
भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही, विजय मल्ल्याचा नवा कांगावा, इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
सुनिल तटकरेंचा इशारा, अजित दादांचे AI व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुनावलं; रोख थेट रोहित पवारांकडे?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
भिवंडीत मोठा ट्विस्ट, भाजपचे नगरसेवक फुटले; महापौरपदावरुन राजकीय कुरघोड्या, ऐनवेळी उमेदवार बदलला
Embed widget