रवींद्र धंगेकरांनी ट्रॅक बदलला, कसब्यातील लोक 'मुखर्जी, हेडगेवार, गोळवलकर आम्ही सारे धंगेकर' घोषणा देणार का? सुषमा अंधारेंचा सवाल
फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे धंगेकर अशी घोषणाही कसब्यातील जनतेने तयार केले. ही घोषणा जेव्हा कसब्याचे जनता देत होती तेव्हा विचारधारेचे पाईक म्हणून देत होती.

Sushma Andhare on Ravindra Dhandekar: पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार रवींद्र धंगेकर पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. काँग्रेसला सोड चिठ्ठी देत रवींद्र धंगेकरांनी ट्रॅक बदलला. कसब्यात 'फुले,शाहू, आंबेडकर.. आम्ही सारे धंगेकर'अशी घोषणा देणारी जनता आता शिंदे गटात गेल्यावर संघाच्या लोकांमध्ये मुखर्जी, हेडगेवार, गोळवलकर ..आम्ही सारे धंगेकर 'अशी घोषणा देतील का ?असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केलाय .धंगेकरांना सहकारी म्हणून सदिच्छाच असल्याचं सांगत जिवाभावाची माणसं दुखावल्याचही अंधारे म्हणाल्या .
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
'धंगेकर कुठेही असले तरी त्यांना सदिच्छाच आहेत. परंतु धमकेरांच्या प्रचारामध्ये फार जीव तोडून आम्ही सगळ्यांनी काम केलं. आमचे नेते सन्माननीय आदित्य ठाकरे यांनी रोडशो केले. मी प्रचार केला. कसब्याच्या जनतेनेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे धंगेकर अशी घोषणाही कसब्यातील जनतेने तयार केले. ही घोषणा जेव्हा कसब्याचे जनता देत होती तेव्हा विचारधारेचे पाईक म्हणून देत होती. टेंडर, कॉन्ट्रॅक्ट अशा कुठल्याही स्वार्थापोटी किंवा भीतीपोटी देत नव्हती. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारायला जपणारा माणूस म्हणून घोषणा देत होती. आता जेव्हा धंगेकर ट्रॅक बदलत आहेत.. तिथे सगळ्या संघांच्या लोकात आता तितक्याच निस्वार्थपणे निरपेक्षपणे फुले शाहू आंबेडकर यांच्या ऐवजी मुखर्जी, हेडगेवार, गोळवलकर आम्ही सारे धंगेकर अशी घोषणा कसब्यातील लोक खरंच तयार होतील का... रवी भाऊ तुम्हाला शुभेच्छाच आहेत. परंतु जिवाभावाची माणसं दुखावली आहेत हे नक्की.' अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी धंगेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर दिली आहे.
धंगेकर कोण होतास तू काय झालास तू..!: हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात गेलेल्या रवींद्र धंगेकरांच्या पक्षांतरानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 'धंगेकर कोण होतास तू काय झालास तू..!'खरतर अनेक दिवसांपासून धंगे कर जाणाऱ्या चर्चा होत्या. पक्षाने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी हा भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचा राजकारणाचा एक बळी आहे. शिवसेनेने त्याला काही देऊ केला असेल त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
