एक्स्प्लोर

अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी, सुषमा अंधारेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा व्हिडिओही शेअर

''आमदारकी, खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान'', असे म्हणत सुषमा अंधारे यांनी एकप्रकारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या विधानपरिषद (Vidhanparishad) निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा होत असून भाजपने प्रज्ञा सातव यांच्यासह 6 नावे जाहीर केली आहेत. त्यानंतर, ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील विधानपरिषद निवडणुकांसाठी नाव जाहीर करण्यात आलं. मविआचे उमेदवार म्हणून स्वत: उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेची उमेदवारी घ्यावी, असा आग्रह काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेककडूनही केला जात होता. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीवर असलेलं नाव मागे घेत स्वत: उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अंबादास दानवे यांचं नाव जाहीर केलं. या स्पर्धेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांचेही नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्यातच, या घोषणेनंतर सुषमा अंधारेंनी आपली भूमिका मांडली आहे. 

''आमदारकी, खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान'', असे म्हणत सुषमा अंधारे यांनी एकप्रकारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमवेतचा व्हिडिओ शेअर करत, उद्धव ठाकरेंशी असलेलं नातंच आपल्यासाठी सर्वस्व असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमधून सूचवलं आहे. उद्धव ठाकरेंना राखी बांधतानाचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी शेअर केला आहे.

दरम्यान, भाजपने आपल्या 6 उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी आणि शिंदेंच्या शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण याची उत्सुकता सर्वांना होती. त्यातच, आज ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर करत अंबादास दानवेंना दुसऱ्यांदा संधी दिली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुषमा अंधारे यांचेही नाव आघाडीवर होते. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची देखील चर्चा होती. त्यामुळे, अचानक त्यांची नावाची घोषणा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, ठाकरेंकडून अंबादास दानवेंचं नाव जाहीर करण्यात आलंय. त्यानंतर, सुषमा अंधारेंनी एका ओळीत आणि व्हिडिओतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.   

काँग्रेसकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली (Congress vidhanparishad)

ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने आघाडीत बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती आहे. त्यातूनच, काँग्रेस विधानपरिषेदेत आपला उमेदवार देणार असल्याची माहिती पुढे येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत असून पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून उमेदवाराचं नाव जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

हेही वाचा

मोठी बातमी, अंबादास दानवेंच्या उमेदवारीवरुन मविआत फूट?, काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार, हर्षवर्धन सपकाळ पक्षनेतृत्त्वासोबत चर्चा करणार

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Embed widget