देवेंद्र फडणवीसांनी जातीत जात ठेवली नाही, राज्यात जातीय द्वेष पसरवला, सरसंघचालकांनी त्यांचे कान उपटावेत: सुषमा अंधारे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली.
Sushma Andhare on Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी फडवीसांना सल्ला द्यावा, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली. फडणवीसांनी राज्यात जातीय द्वेष पसरवला आहे. सरसंघचालकांनी त्यांचे कान उपटावेत असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला.
शिवसेना ठाकरे गटाचे दसरा मेळावा आज दादरमधील शिवाजी पार्कवर होत आहे. यावेळी बोलताना सुषणा अंधारे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सध्या शेतीमालाला भाव नाही. कापसाचं काय झालं? यावर कोणी बोलत नाहीत. जातीत भांडणे लावली जात असल्याचे अंधारे म्हणाल्या.
आपण कधी बहिणीला पैसे दिले म्हणून बॅनर लावलेत का?
आपण कधी बहिणीला पैसे दिले म्हणून बॅनर लावलेत का? आपल्याला नात्यांची किंमत कळते असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. यांना बहिणीचे नाते कळत नाही. बाईपणावर हल्ले करता, हे संस्कार बाळासाहेबांचे असू शकत नाही ना ते आनंद दिघेंचे आहेत असेही अंधारे म्हणाल्या. तुमचे हे संस्कार रेशीमबागेतील आरएसएसच्या बाटगेंचे असू शकतात. न्याय तुम्ही अत्याचार झालेल्या महिलेला देऊ शकत नाही असेहगी अंधारे म्हणाल्या.
दीड हजार रुपये फडणवीसांनी बंगला विकून दिले नाहीत
दीड हजार रुपये आम्हाला फडणवीसांनी नागपूरचा बंगला विकून दिले नाहीत असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. ना मुख्यमंत्र्यांनी आपली जमीन विकून पैसे दिले नाहीत. आमचेच पैसे आहेत, क्रेडिट घेऊ नका. राज्यातील जनतेच्या टॅक्समधून पैसे दिले आहेत. त्यामुळं तुम्ही त्याचे क्रेडीट घेऊ नका असेही अंधारे म्हणाल्या.गावगाड्यातील वीण उसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सगळी माणसं एकत्र नांदत होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी द्वेष पसरवत भांडणं लावल्याचे अंधारे म्हणाल्या. लोकं विचारतायेत रोजगाराचे काय झाले? एमपीएससीचं काय झालं? अनेक प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं यांच्याकडे नाहीत. त्यामुळे हे असं राजकारण केलं जात आहे. कोणत्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली? असा सवाल अंधारे यांनी केला. रस्ते नाही, वीज नाही. किती लोकांना भुलवाल? कापसाचं काय झालं? आर्थिक प्रश्नांवर ते बोलतच नाहीत असे अंधारे म्हणाल्या. दोन लाख 37 हजार कोटी रुपये कर्ज दहा वर्षांआधी होतं. आता हे कर्ज 9 लाख कोटींवर गेल्याचे अंधारे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या: