"शरद पवारांनी आदेश दिल्यास पाकिस्तानातूनही निवडणूक लढवेन", राष्ट्रवादीची रणरागिणी मैदानात
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज नांदेडच्या विश्रामगृहात पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत सूर्यकांता पाटील हजर होत्या.
Nanded: लोकसभेतील पराभवाचं आत्मचिंतन सुरु असतानाच भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चांगल्याच सक्रीय झाल्याचं दिसतंय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आदेश दिला तर मी पाकिस्तानमधूनही निवडणूक लढवायला तयार आहे, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सूर्यकांता पाटील म्हणाल्या. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज नांदेडच्या विश्रामगृहात पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत सूर्यकांता पाटील हजर होत्या. स्वगृही परतल्याबद्दल त्यांचा पक्षाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
'साहेब म्हणाले तर पाकिस्तानमधूनही निवडूक लढेन'
विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून जोरदार तयारी सुरु असून मराठवाड्यात त्यांच्या आढावा बैठका, आणि संभाव्य उमेदवारांचा शोध सुरु आहे. यासाठी आज नांदेडमध्ये पार पडलेल्या बैठकीत विधानसभा निवडणूकीत जागा वाटपाचा तिढा सूटला नसला तरी पक्षांकडून जागांवर दावा सांगणं सुरु असल्याचं त्या म्हणाल्या. नांदेड जिल्ह्यातील एकूण ९ मतदारसंघांपैकी चार जागांवर आम्ही मागणी करणार आहोत. तो आमचा हक्क आहे. असेही सुर्यकांता म्हणाल्या. शरद पवारांनी सांगितलं तर पाकिस्तानातूनही निवडणूक लढवायला मी तयार असल्याचं त्या म्हणाल्या.
अजित पवार, हर्षवर्धन पाटलांवर गंभीर आरोप
नांदेडच्या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सूर्यकांता पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांनी आणि हर्षवर्धन पाटलांनी माझा कारखाना विकला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
त्या म्हणाल्या, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेने माझ्या सहकारी साखर कारखान्याला कर्ज दिले होते. ते कर्ज परत करण्याच्या दृष्टीतून अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांनी ती जमीन विकली आणि बँकेला पैसे परत करण्याऐवजी कुठलीही सेटलमेंट न करता ते खापर माझ्या माथी फोडलं आहे. त्यामुळे माझ्याकडे काही नसून मी कुठून बँकेचे पैसे भरणार असं माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील म्हणाल्या आहेत. शरद पवार यांनी मला आदेश दिल्यास विधानसभेची निवडणूक मी पाकिस्तानमधून देखील लढवायला तयार आहे,असे मिश्किल उत्तर सुर्यकांता पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
हेही वाचा: