"अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांनी माझा कारखाना विकला", माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा गौप्यस्फोट
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सूर्यकांता पाटील ॲक्टीव मोडवर आल्या असून त्यांनी उपमुख्यमंंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Nanded: ''अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांनी माझा कारखाना विकला' माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी गोप्यस्फोट केला आहे. भाजपमधून 10 वर्षांनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात आल्यानंतर त्यांना आज नांदेड जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सूर्यकांता पाटील ॲक्टीव मोडवर आल्या असून त्यांनी उपमुख्यमंंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज विश्रामगृहात पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत सूर्यकांता पाटील हजर होत्या. स्वगृही परतलेल्या नेत्यांचा यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सत्कार करण्यात आला. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाला माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील यांच्यासह माजी राज्यमंत्री डॉ माधवराव पाटील किन्हाळकर, माजी आमदार प्रदीप नाईक, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष भगवान आलेगावकर शहराध्यक्ष डॉ सुनील कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवार, हर्षवर्धन पाटलांनी माझा कारखाना विकला
दरम्यान, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेने माझ्या सहकारी साखर कारखान्याला कर्ज दिले होते. ते कर्ज परत करण्याच्या दृष्टीतून अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांनी ती जमीन विकली आणि बँकेला पैसे परत करण्याऐवजी कुठलीही सेटलमेंट न करता ते खापर माझ्या माथी फोडल आहे. त्यामुळे माझ्याकडे काही नसून मी कुठून बँकेचे पैसे भरणार असं माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील म्हणालेत. शरद पवार यांनी मला आदेश दिल्यास विधानसभेची निवडणूक मी पाकिस्तानमधून देखील लढवायला तयार आहे,असे मिश्किल उत्तर सुर्यकांता पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
नुकतेच राष्ट्रवादीत गेल्यानंतर केलेल्या गौप्यस्फोटाने चर्चा
काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. लोकसभा निवडणीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. महायुतीला फटका बसल्यानं भाजपच्या जेष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. १० वर्षांनंतर घरवापसी केली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा गौप्यस्फोट केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
विधानसभेसाठी चार जागांवर आमचा हक्क
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून तयारी सुरु झाली आहे. जागा वाटपाचा तिढा सुटला नसला तरी पक्षाकडून जागांवर दावा सांगणे सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ मतदार संघ आहेत. त्यातील चार जागांची आम्ही मागणी करणार आहोत. तो आमचा अधिकार असल्याचे त्या म्हणाल्या.
साखर कारखान्यांच्या मुद्द्यावर बोलताना सूर्यकांता पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. माझ्या साखर कारखान्याला बँकेने कर्ज दिले होते. पण अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांनी कारखाना विकला, वन टाइम सेटलमेंट करून घ्यायला पाहिजे होतं, पण वेळेवर घेतले नाही. असा अरोप त्यांनी केला.
हेही वाचा:
Supriya Sule : रक्षाबंधनाला अजितदादांना राखी बांधणार का? सुप्रिया सुळेंनी एका शब्दात विषय संपवला