एक्स्प्लोर

Suraj Chavan Surrendered : किरकोळ कलम लावलीत; पान टपरीवरची भांडण होती का? जीव गेला असता; विजय घाडगेंनी सूरज चव्हाण जामीन प्रकरणात पोलिसांवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

Suraj Chavan Rada : पोलिसांचं म्हणणं आहे तो पहाटे पोलीस स्टेशनमध्ये आला आणि जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करून तो निघून गेला. आम्हाला पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय आहे, असंही घाडगेंनी म्हटलं आहे.

लातूर: शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील अकरा फरार आरोपींपैकी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरज चव्हाण फरार होता. मारहाण प्रकरणानंतर फरार असलेले सूरज चव्हाण पोलिसांना शरण आला आहे, सूरज चव्हाणसह 10 जण पोलिसांच्या ताब्यात होते. सुरज चव्हाण रात्री पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांना जामीन ही मंजूर झाला. लातूर पोलिसांनी सुरज चव्हाण यांना पाठीशी घालत, कमालीची गुप्तता पाळली होती. सुरज चव्हाण रात्री पोलीस ठाण्यात हजर झाले नंतर पहाटे जमानत देखील मिळाली. या घटनेनं  शेतकरी संघटनेने संताप व्यक्त केला आहे. तर पोलिस सुरज चव्हाणला पाठीशी घालत आहेत. आता उद्रेक होईल असं विजयकुमार घाडगे यांनी म्हटलं आहे. गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, मारणाऱ्यांच्या विरोधात असंघटित गुन्हेगारीची कलम लागू करून कडक शासन करावे विजयकुमार घाडगे यांची मागणी केली.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर विजयकुमार घाडगे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. विवेकानंद पोलीस ठाण्याचे पीआय संतोष पाटील यांना फोन करून विजयकुमार घाडगे यांनी जाब विचारला आहे. विजयकुमार घाडगे प्रकरणातील अकरा आरोपींपैकी दहा जण अटकेत आहेत, आणि दहा जनाची जमानत झाली आहे, यात सुरज चव्हाण याचाही समावेश आहे. 

पान टपरी वरची झालेली भांडण होती का?

याबाबत बोलताना विजयकुमार घाडगे म्हणाले, पोलिसांचं म्हणणं आहे तो पहाटे पोलीस स्टेशनमध्ये आला आणि जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करून तो निघून गेला. आम्हाला पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय आहे. इतक्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपी तुम्ही किरकोळ कलम लावता आणि पहाटे लोक जागे व्हायच्या आधी त्यांना लातूर मधून बाहेर पाठवून देता. हा कोणता प्रकार आहे. तुम्ही  चोराला संरक्षण देतात, ज्याने गुन्हा केला आहे, आमच्यावर प्राण घातक हल्ला केला, आमच्या एखाद्या सहकार्याचा किंवा माझा जीव गेला असता तुम्ही त्याला सोडून देत आहात, किरकोळ कलम लावली आहेत. पान टपरी वरची झालेली भांडण होती का? ती संपूर्ण महाराष्ट्राने तो व्हिडिओ पाहिला आहे. माझं गृहमंत्र्यांना आवाहन आहे. गृहमंत्री साहेब यात लक्ष घाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ही गोष्ट आवडलेली नाही, तुम्ही तत्काळ यामध्ये लक्ष घाला सुरज चव्हाण किंवा त्याचे जे कोणी सत्य आहे. त्यांना यांच्यावर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीचे प्रकरण गेल्या रविवारी घडले होते. याप्रकरणी लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील नऊ जणांना आत्तापर्यंत ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांनी दिली. या प्रकरणातील मुख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरज चव्हाण आज पहाटे हजर झाले होते, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आल्याची माहिती लातूरचे पोलीस उपाधीक्षक रणजीत सावंत यांनी दिली आहे.

 नेमकं काय घडलं?

लातूरमध्ये (Latur) अखिल भारतीय छावा संघटना (Chava Sanghatana) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना (Sunil Tatkare) निवेदन दिलं. यावेळी त्यांच्या टेबलावर पत्ते फेकण्यात आले. नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. यानंतर छावा संघटनेनं देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

कोण आहे सूरज चव्हाण?

1)  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे सध्याचे युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेत. 
2)  सूरज चव्हाण हे अजित पवारांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते समजले जातात. 
3) एकत्रित राष्ट्रवादीत महाराष्ट्र युवकच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सूरज चव्हाण यांनी पार पाडली आहे. 
4) सूरज  चव्हाण हे मुळचे लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळचे रहिवासी आहेत.  
5)राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्या 10 मध्ये अजित पवारांसोबत जाणारा कार्यकर्ता म्हणजे सूरज  चव्हाण होते. 
6)  2019 साली अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतल्यानंतर आमदारांना परत आणण्यात महत्वाची भूमिका सूरज चव्हाण यांनी बजावली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये लातूरमध्ये मोठा राडा झाला. विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मागणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना दादांच्या पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी कोपराने आणि बुक्क्यांनी मारहाण केली. सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget