Supriya Sule: "मी फकीरासारखी निवडणूक लढवली अन्...", सुप्रिया सुळेंनी सांगितला लोकसभेला अनुभव
Supriya Sule: सुप्रिया सुळे यांनी ‘फकीरा’प्रमाणे लोकसभा निवडणूक लढवल्याचा खुलासा केला आहे. तर या लोकसभेला त्या जिंकतील असा विश्वास त्यांना नव्हता असंही त्यांनी म्हटलंय.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांचा लोकसभेचा अनुभव एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितला आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ‘फकीरा’प्रमाणे लोकसभा निवडणूक लढवल्याचा खुलासा केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) त्या बारामतीमधून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत, ज्यांच्या विरोधात अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावेळी बोलताना सांगितलं, त्या जिंकणार याची त्यांना 100 टक्के खात्री नव्हती.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, "मी निवडणूक जिंकेन याची मला 100 टक्के खात्री नव्हती, कारण मी खूप अडचणींविरुद्ध लढत होते." खरं तर लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाचा खेळ पाहायला मिळाला, त्यात आधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि नंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पक्षात बंडखोरी केली. शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवार यांनी पक्षाच्या अनेक आमदारांचं समर्थन घेऊन भाजप - सेनेच्या युतीत प्रवेश केला होता.
फकीराप्रमाणे निवडणूक लढवली - सुप्रिया सुळे
नंतर प्रदीर्घ चर्चेनंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवले. आता अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत आणि राज्यात खरे-खोटे दावे सुरू आहेत. मुलाखतीत सुप्रिया सुळे या पक्ष फुटण्याच्या संदर्भात म्हणाल्या, "मी फकीरासारखी (वैरागी) ही लोकसभा निवडणूक लढवली." सुळे यांनी पवारांचा पराभव करून चौथ्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा मान मिळवला.
मुख्यमंत्री चेहऱ्याच्या चर्चेवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाही जवळ आल्या असून त्याआधीच राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, विरोधी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाची घोषणा करण्यात आलेली नाही. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडी (MVA) मुख्यमंत्री चेहरा जाहीर करणार नाही. शरद पवारांचा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युतीत निवडणूक लढवणार आहे.
तोपर्यंत माझा लढा संपणार नाही....
सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी काल (शुक्रवारी) बोलताना सांगितले की, जोपर्यंत त्यांना त्यांचे वडील शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह परत मिळत नाही तोपर्यंत माझा लढा संपणार नाही.