Vaibhavi Deshmukh: सुप्रिया सुळेंचा संतोष देशमुखांच्या लेकीला बारावी पास झाल्याच्या शुभेच्छा द्यायला फोन, वैभवी म्हणाली, 'ताई, आता काय उपयोग…'
Vaibhavi Deshmukh 12th Exam Result: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या लेकीला वैभवीला बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळालं, तिचं सुप्रिया सुळे यांनी फोन करून अभिनंदन केलं आहे.

Vaibhavi Deshmukh HSC Result: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर निष्पक्षपातीपणे तपास व्हावा यासाठी आंदोलन करत, घरात लहान भाऊ, आई, लढणारा काका यांच्यासोबत उभं राहून संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखने (Vaibhavi Deshmukh) बारावीला चांगला अभ्यास करत बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. आज बारावीचा निकाल लागला वैभवीला 85.33% टक्के गुण मिळाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संतोष देशमुखांच्या मुलीला वैभवीला कॉल केला आहे.
सगळा आनंद हिरावून घेतला ताई....
खासदार सुप्रिया सुळे यांनी मिळालेल्या यशाबद्दल वैभवी देशमुख हीच अभिनंदन केलं. यावेळी सगळा आनंद हिरावून घेतला ताई, आता काय उपयोग असं म्हणत वैभवी देशमुखने आपल्या वडिलांच्या नसण्याची खंत व्यक्त केली. सुप्रिया सुळेंना फोनवरती बोलताना वैभवीने आता फक्त न्याय मिळायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर सुप्रिया सुळे यांनी मला तुझा खूप अभिमान आहे, असं म्हणत वैभवीचं कौतुक केलं आहे.
वैभवीला 85.33% मिळाले
आज बारावीचा निकाल लागला मला 85.33% गुण मिळाले आहेत. परंतु, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत, अशा शब्दात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने आपल्या वडिलांची आठवण जागवली. 12 वीच्या निकालानंतर वैभवीचे महाराष्ट्र भरातून कौतुक होत आहे. मात्र, आज तिचं कौतुक करायला तिचे वडील तिच्यासोबत नाहीत याचं मोठं दुःख वैभवीला आहे. वैभवीच्या डोळ्यातील अश्रू तिच्या आनंदी क्षणात अनेकांचे डोळे पाणावणारे ठरत आहेत. माझी NEET परीक्षेची देखील तयारी सुरू आहे. परंतु, काल झालेला नीटचा पेपर मला अवघड गेलेला आहे, त्याच्यात स्कोरिंग कमी येत आहे. पण, मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे, अशी जिद्द देखील तिने बोलून दाखवली.
दरम्यान, वडिलांच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर असताना वैभवीने 12 वीची परीक्षा दिली होती. आज सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे तिने म्हटले. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच येईल असा मला विश्वास आहे. तर आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत याचं मला दुःख आहे, अशी खंत तिने व्यक्त केली होती.
वडिलांच्या खुनातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी
माझ्या वडिलांचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला होता, त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्याला देखील अटक केली जावे, अशी मागणी वैभवी देशमुख हिने यावेळी केली.
वैभवीचे गुणपत्रक
वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. संतोष देशमुख यांच्या मुलीला इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत.
आणखी वाचा























