Sunil Tatkare : विकृतपणा थांबवा, वॉशरुमसाठी गेलो होतो, शरद पवारांच्या भेटीच्या वृत्तावर सुनील तटकरे संतापले!
Sunil Tatkare on Sharad Pawar, मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) येऊन गेले, असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला होता.
Sunil Tatkare on Sharad Pawar, मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) येऊन गेले, असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला होता. दरम्यान देशमुखांच्या दाव्याबाबत सुनील तटकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. विकृतपणा थांबवा, वॉशरुमसाठी गेलो होतो, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
माझी आणि शरद पवार भेट होण्याचे काही कारण असू शकत नाही
सुनील तटकरे म्हणाले, माझी शरद पवार आणि जयंत पाटलांची भेट होण्याचे काही कारण असू शकत नाही. रस्त्यावरचा प्रवास करत असताना मी फार लांबून नाशिकमध्ये पोहोचलो होतो. माझी पुढची मीटिंग तेथे होती. कार्यकर्ता गाडीमध्ये होता, त्याला विचारलं इथं वॉशरुमची सोय आहे का? तिथे मी गेलो. 3-4 मिनीटे थांबलो. सुदैवाने असं झालं की, तिथे हेमंत टकलेंचा कार्यकर्ता होता. तो मला भेटला. माझ्या ओळखीचा निघाला.
पराजय समोर दिसत आहे आणि तुतारीचा आवाज निघत नाहीये, त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले आणि निराश झालेले अनिल देशमुखांसारखे नेते खालच्या पातळीवर जाऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकेकाळी अनिल देशमुख सुद्धा आमच्यासोबत येणार होते. त्यांना मंत्रीपद हवं होतं. भाजपने त्यांना नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख राहिलेले आहेत, अशी टीकाही सुनील तटकरे यांनी केली. महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला गंभीरपणे घेण्याची गरज नाही. ज्यांना स्वतःच्या मतदारसंघात ओळखले जात नाही. आमच्यावर जे 70 हजार कोटींची आरोप केले जात होते, त्याला आज फडणवीसांनी फुल स्टॉप दिला आहे, असेही तटकरे म्हणाले.
नाशिकमधील विधानसभा सदस्यांची त्याठिकाणी बैठक घेतली
गेले दोन दिवस अखेरच्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मी नाशिक आणि पालघर मतदारसंघामध्ये होतो. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि नाशिकमधील विधानसभा सदस्यांची त्याठिकाणी बैठक घेतली. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अशाच पद्धतीच्या बैठका होत्या. प्रत्येक विधानसभा सदस्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा केली. गिरीश महाजन यांच्याशीही चर्चा केली. आमचे नेते भुजबळ साहेब यांच्याशीही चर्चा झाली. मला विश्वास आहे की, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळेल, असेही सुनील तटकरे यावेळी बोलताना म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या