एक्स्प्लोर

Baramati Vidhansabha Bypoll: बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाल्या...

Baramati Vidhansabha Bypoll: बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत, निवडणुकीसाठी काँग्रेसने काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्याची माहिती काल समोर आली होती.

बारामती : बारामती पोट निवडणुकीच्या अनुषांगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (sunetra pawar) यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) फोन केल्याची माहिती समोर आली आहे. फोन करून सुनेत्रा पवारांनी (sunetra pawar) उद्धव ठाकरेंना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवार विनंती करणार असल्याची माहिती समोर आली आहे.तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहे. सुनेत्रा पवार सोमवारी (6 एप्रिलला) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, मंत्री उपस्थित राहणार आहेत. (uddhav thackeray)

बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत, निवडणुकीसाठी काँग्रेसने काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्याची माहिती काल समोर आली होती. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षांशी देखील उमेदवारी बाबत चर्चा करत आहे, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस कडून बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठीच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनेत्रा पवार यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना केल्याची माहिती आहे.(uddhav thackeray)

दरम्यान काँग्रेस पक्ष राहुरी आणि बारामती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे, या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याच्या हालचाली ही काँग्रेसने सुरू केल्या आहेत, अशातच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते त्यांना विनंती करणार आहेत, आणि आपल्या पक्षाला पाठिंबा द्यावा अशी मागणी करणार आहेत पण काँग्रेस पक्ष या संदर्भात काय भूमिका घेते हेही महत्त्वाचं ठरणार आहे, दरम्यान सुनेत्रा पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरेंची भूमिका काय असणार आहे हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही पोट निवडणूक बिनविरोध हवी त्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Vidhansabha Bypoll: 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी

महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राहुरी आणि बारामतीसाठी 23 एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.  भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झालं. यामुळं बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.  

Vidhansabha Bypoll: बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना जारी :  30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Embed widget