Suhas Palshikar : महाराष्ट्राची हवा कुणाच्या बाजूने? देशात कुणाची सत्ता? राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांचे 'माझा कट्टा'वर बेधडक विश्लेषण
Suhas Palshikar on Majha Katta : महाराष्ट्राच्या राजकारणात गट पडणे, कोणाचा पायपोस कोणाच्या पायाशी नसणे. सर्वप्रकारच्या अनिश्चितता असणे. हे नॉर्मल इलेक्शनचे वैशिष्ट असते.
Suhas Palshikar on Majha Katta : " महाराष्ट्राच्या राजकारणात गट पडणे, कोणाचा पायपोस कोणाच्या पायाशी नसणे. सर्वप्रकारच्या अनिश्चितता असणे. हे नॉर्मल इलेक्शनचे वैशिष्ट असते. महाराष्ट्रात निवडणूक नॉर्मल आहे. 2014 मध्ये 43 किंवा 40 टक्के लोकांनी प्रचार सुरु करण्याच्या आधीच मतदान कोणाला करायचे हे नक्की केले होते. पण या निवडणुकीत जंग जंग पछाडून आपल्या मतदाराच्या मागे जावे लागत आहे. हे नॉर्मल इलेक्शनचे वैशिष्ट आहे. दिंडोरीला पंतप्रधानांची सभा होते, हे नॉर्मल इलेक्शनचे लक्षण आहे", असे राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर (Suhas Palshikar) म्हणाले. ते 'माझा कट्टा'वर बोलत होते.
भाजपला आघाडी आहे पण, काही वार्निंग बेल होत्या
सुहास पळशीकर (Suhas Palshikar) म्हणाले, मी लोकनिती या संशोधकांच्या गटाबरोबर काम केलं आहे. ती व्यावसायिक संशोधन करणारी संस्था नाही. त्यामध्ये आम्हाला असं दिसत होतं की, भाजप आणि काँग्रेसची मतं किंचित वाढणार आहेत. याचा अर्थ अनेक छोटे पक्ष आहेत त्यांची मत कमी होतील. भाजपला आघाडी आहे पण, काही वार्निंग बेल होत्या. काही लोकांच्या मते भाजपची कामगिरी नेगेटिव्ह होती. आर्थिक कामगिरी नेगेटिव्ह होती, पण तरिही भाजपची 1 एप्रिलला आघाडी मिळत होती. त्यावेळी भाजपच्या 20 जागा कमी किंवा जास्त होतील अशी स्थिती होती. पण आता ज्याप्रकारे प्रचार झाला. भाजपला जागा राखणे देखील मुश्कील आहे. भाजपच्या जागा किती कमी होतील, हे आत्ता सांगणे माझ्यासाठी दुरापास्त आहे.
अर्थतज्ज्ञ जरी काही म्हणत असले तरी बेरोजगारी आहे
पुढे बोलताना सुहास पळशीकर (Suhas Palshikar) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरचे लोकांचे 2014 मधील आकर्षण आणि 2019 मधील विश्वास आता कमी झालेला दिसतोय. अर्थतज्ज्ञ जरी काही म्हणत असले तरी बेरोजगारी आहे , हे सत्य आहे. लोकांचे जीवनमान उंचावलेलं नाही. गरिबी आणि महागाईचे प्रश्न विरोधी पक्षांना उठवता आले नसले तरी लोकांच्या मनात आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाबाबत आकर्षणाचा भाग असतो, तो या निवडणुकीत कमी झालेला आहे. भ्रष्टाचार तात्कालीक मुद्दा असतो. 2014 साली भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्वाचा झाला याला केवळ भ्रष्टाचार हे कारण नव्हते. त्यावेळी रामदेवबाबा, किरण बेदी यांसारखी लोक तिथे पोहोचली. त्यामुळे अनेक मुद्दे त्यावेळी निवडणुकीत होते.
इतर महत्वाच्या बातम्या