Sudhir Mungantiwar : राज्यात विषारी विचार पेरणाऱ्यांचे नकाब फाडणारच, सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा
पक्ष आता 'भारत जोडे' ही यात्रा जरी काढत असला तरी या पक्षाने सत्ता असताना 'भारत तोडो' (Bharat Jodo) हेच धोरण देशात राबवले असल्याची टीका यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
नागपूरः दहशतवादी याकूब मेमन (yakub memon) याचा मृतदेह न्यायालयाच्या निर्णयाने परिवारा दिला गेला होता. मात्र राजकीय पक्षांकडून सरकारला बदनाम करण्यासाठी बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्यालाही याकूब प्रकरण बद्दल काही माहित नाही. त्यामुळे आपल्या स्वार्थी राजकारणासाठी अशा विचारांचा पुढे आणणाऱ्यांचे चेहरे जनतेसमोर आलेच पाहिजे, या संदर्भात मी मी उपमुख्यमंत्र्यांशी बोललोय असल्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी सांगितले. या संदर्भात पुढील चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी दिल्याचेही यावेळी ते म्हणाले.
महाविकास आघाडीतील मंत्र्यांना होती माहिती?
पुढे मुनगंटीवार म्हणाले, गेल्या सरकारमध्ये ही माहिती मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे पोहोचली होती की नाही, तेव्हा ते काय करत होते. झोपा काढत होते का. मागच्या सरकारला ही माहिती होती का, गृहमंत्री रोज मुख्यमंत्र्यांना राज्यातील घटनांबद्दल अवगत करतात. ही माहिती गृहमंत्र्यांना होती का, त्यांनी माहिती तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिली होती का हे तपासावे लागेल. जर त्यांना ही माहिती असून ही तत्कालीन सरकारने पायबंद का केला नाही, याची माहिती समोर आली पाहिजे.
कॉंग्रेसचे धोरण 'भारत तोडे'
देशभरात कॉंग्रेसमुक्त (INC) अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळेच एक एक राज्य कॉंग्रेसच्या हातून निसटत चालला आहे. तसेच कॉंग्रेसच्या नेत्यांमध्येही आपसांत भांडण आहे. तसेच पक्ष आता भारत जोडे ही यात्रा जरी काढत असला तरी या पक्षाने सत्ता असताना भारत तोडो (Bharat Jodo) हेच धोरण राबवले असल्याची टीका यावेळी मुनगंटीवार यांनी केली. तसेच शिखांचा तिरस्कार कुणी केला होता? हजारो शिखांना मारण्यात आले होते. आता केरळमध्ये जाऊन तुम्ही सांगता द्वेशाचं राजकारण करु नका. आता सत्ता दूर जात आहे, तेव्हा आता भारत जोडो आठवत आहे, असल्याचा टोलाही यावेळी त्यांनी लागावला.
बारामतीचा विकास म्हणजे राज्याचा विकास?
राज्यात फक्त बारामती हे शहर आहे का? बारामतीचा विकास म्हणजे राज्याचा विकास होतो का? हे आता समजण्याची गरज आहे. सुप्रिया ताईंचा (Supriya Sule) सरकार आता गेलाय. त्यांच्या सरकारमध्ये एवढे मुख्यमंत्री होते की, मोजता ही येणार नाही. यांच्या राजकारणात फक्त बारामतीचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास असा समज असल्याचेही यावेळी ते म्हणाले. या पक्षांना राजकीय अल्झायमर झाला असेल असी टीकाही यावेळी त्यांनी केली.
हत्ती हलवण्याचा निर्णय मागच्या सरकारचा
गडचिरोली ( Gadchiroli Elephants) येथील हत्ती गुजरात येथील जामनगरमध्ये हलविण्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मागच्या सरकार मध्ये हत्ती हलवण्याचा निर्णय झाला. तेव्हा हत्तीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गडचिरोलीला डॉक्टर नव्हते. त्यामुळे जामनगर (Zoo in Gujarats Jamnagar) मध्ये फक्त गडचिरोलीतूनच नव्हे तर कर्नाटकमधील (elephants from karnataka) हत्ती ही हलवले होते. आता 5 तारखेला आम्ही निर्णय घेतला आहे की, यापुढे गडचिरोली मधून कोणतेही हत्ती हलवले जाणार नाही. तिथेच विशेष पार्क बनवून त्यांची निगा ठेवली जाईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या