Video: ... तर राजकारण सोडून देईन; सुधाकर बडगुजरांचे शिवसेना नेतृत्वालाच चॅलेज, सगळंच सांगितलं
शिवसेना युबीटी पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्या नाशिकमधील संपर्क कार्यालयाबाहेर समर्थकांकडून गर्दी करण्यात आली आहे.

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सुधाकर बडगुजर (Sudhakar badgujar) यांची हकलपट्टी करण्यात आलेली आहे. पक्षात नाराजी व्यक्त करणे, हा काही गुन्हा नाही. मात्र, या संदर्भात माझ्याशी कुठलीही चर्चा झाली नाही. मी नाशिकच्या बाहेर असल्याने पक्षाच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहू शकलो नाही. माझा नियोजित दौरा असल्याचे मी कळवले देखील होते. परंतु, पक्षावर नाराजी व्यक्त कारणं किंवा मुख्यमंत्र्याना भेटल्यावरून जर अशी कारवाई होत असेल तर मला वाटतं हे चुकीची आहे. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या शिवसेनेचे (Shivsena) उपनेते सुधाकर बडगुजर यांनी दिली होती. त्यानंतर, आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली. मी माझी भूमिका स्पष्ट केली नाही, लोकांना विचारुन निर्णय घेईल. पण, भाजपच्या (BJP) नेत्यांनी जी पत्रकार परिषद घेतली, तो एवढा थयथयाट का केला, असा खोचक सवालही बडगुजर यांनी उपस्थित केला. तसेच, शिवसेना नेतृत्वाला देखील चॅलेंज केलं आहे.
शिवसेना युबीटी पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्या नाशिकमधील संपर्क कार्यालयाबाहेर समर्थकांकडून गर्दी करण्यात आली आहे. तसेच, जो काही निर्णय सुधाकर बडगुजर यांनी घेतला, तो आम्हाला मान्य असेल असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढवण्यासाठी सुधाकर बडगुजर यांनी जिल्हाभर मोठी कामगिरी केली आहे. मात्र, पक्षाकडून ही चुकीची कारवाई केल्याचं मत बडगुजर यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच, बडगुजर यांनी देखील पत्रकार परिषद घेत लवकरच माझ्या लोकांना विचारुन पुढील निर्णय घेईल, असे सांगितले.
मी प्रवासात असतानाच मला शिवसेना पक्षातून हकालपट्टी झाल्याची माहिती मिळाली. पण, पक्षात खरे बोलणे हा गुन्हा असेल तर तो मी केला आहे. आजवर कुठलीही अशी कारवाई झाली नव्हती. गिरीश महाजन यांच्यासोबत फोटो होता, तेव्हा तुम्ही असा फोटो का काढला अशी विचारणा खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावेळी, अरविंद सावंत हे सुद्धा होते, मग केवळ माझ्यावरच कारवाई का? असा सवाल मी त्यांना केल्याचे बडगुजर यांनी सांगितले. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि पक्षात वादळ आले, नागरिकांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री यांना भेटलो होतो. बडगुजर म्हणजे शिवसेना नाही बरोबर आहे, उध्दव ठाकरे म्हणजे शिवसेना आहे. मी शिवसेना संघटनेविरोधी एक काम केले दाखवून दिले तर राजकारण सोडून देईल, अशा शब्दात सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना नेतृत्वालाच चॅलेंज दिले आहे. संजय राऊत यांच्याशी मोबाईलवर झालेले मेसेज बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. विलास शिंदेंची नाराजी याधी मी काढली, त्यावेळी डी. जी. सूर्यवंशी हे देखील तिथे होते, असेही त्यांनी सांगितले.
भाजप नेत्यांचा एवढा थयथयाट का?
नाशिकमधील शिवसेना युबीटी पक्षाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यावर, स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना भेटलो ही माझी चूक नाही, मी कामगारांची बाजू मांडण्यासाठी गेले होते. राजकारण किंवा पक्षप्रवेशासंदर्भाआत मी माझी भूमिका स्पष्ट केली नाही. माझ्या लोकांना विचारून पुढील निर्णय घेईल. पण, भाजपच्या नेत्यांनी जी पत्रकार परिषद घेतली, एवढा थयथयाट का केला? वादळ येण्याआधीच लाटा का मोजत आहेत, असा टोलाही बडगुजर यांनी भाजप आमदार सीमा हिरे यांना लगावला.
हेही वाचा
आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावे; 'बकरी ईद'वरुन मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती





















