Sonali Bendre On Raj Thackeray: आमचे ठाकरे कुटुंबाशी जुनं नातं, सोनाली बेंद्रेची प्रतिक्रिया, Viral Video वरही मौन सोडलं
Sonali Bendre On Raj Thackeray: एका कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकत्र दिसून आले. त्यानंतर मुंबईतील एका कार्यक्रमात 30 वर्षांनी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे भेटले होते.

Sonali Bendre On Raj Thackeray: बॉलिवूडमध्ये बऱ्याच ग्लॅमरस अभिनेत्री आहेत, त्यांच्या अफेअरबाबत विविध गॉसिप सुरूच असते. त्यातच 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. दरम्यान, 1996 साली मुंबईत पहिल्यांदा मायकल जॅक्शनच्या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकत्र दिसून आले. त्यानंतर मुंबईतील एका कार्यक्रमात 30 वर्षांनी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे भेटले होते. यादरम्यान राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेचा एक व्हिडीओ सोशल मीडियात बराच व्हायरल झाला. त्यावर आता स्वत: सोनाली बेंद्रे हिने राज ठाकरेंसोबत्या नात्यावर मौन सोडलं आहे.
View this post on Instagram
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सोनीली बेंद्रेला देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे अनेक वर्षांनंतर राज ठाकरे आणि सोनीली बेंद्रे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर आता स्वत: सोनाली बेंद्रे हिने स्पष्टपणे खुलासा केला आहे. सोनाली बेंद्रेनं नुकतीच एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं.
मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत काल २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत, मुंबईत, छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी पुस्तकांचं भव्य प्रदर्शन आयोजित केलं आहे. त्याचं उदघाट्न झाल्यावर महाराष्ट्रातील मान्यवरांनी त्यांच्या आवडीची एक एक मराठी कविता सादर… pic.twitter.com/piTzk64OS0
— Raj Thackeray (@RajThackeray) March 1, 2025
आमचे ठाकरे कुटुंबाशी गेली अनेक दशके नाते- सोनाली बेंद्रे
मुलाखतीत राज ठाकरेंसोबतच्या नात्याबाबत प्रश्न विचारला असता सोनाली बेंद्रे म्हणाली की, काय खरेच, मला तर शंका आहे. व्हिडीओबाबत बोलायचे झाले तर मी माझ्या बहिणीसोबत बोलत होती, जी तिथेच उभी होती. मला माहिती नाही. जेव्हा लोक अशाप्रकारे बोलत असतात तेव्हा ते चांगले वाटत नाही. कारण त्यात कुटुंब सहभागी असते, अनेक लोक सहभागी असतात. आमचे ठाकरे कुटुंबाशी गेली अनेक दशके नाते आहे, असं सोनाली बेंद्रेने सांगितले. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे, त्यांची सासू आणि माझी मावशी सर्व चांगल्या मैत्रिणी होत्या. शर्मिला ठाकरे यांच्या आईने 10 दिवस मला त्यांच्याकडे ठेवले होते कारण ती माझ्या आईची छोटी बहीण होती, असंही सोनाली बेंद्रेने सांगितले.
सोनाली बेंद्रे मुलाखतीत काय काय म्हणाली?, संपूर्ण VIDEO:
EP-305 | Sonali Bendre on Salman Khan, Raj Thackeray, Politics, Battle with Cancer & Her New Book#anipodcastwithsmitaprakash #sonalibendre #bollywood
— ANI (@ANI) June 7, 2025
Premiering now: https://t.co/p77CG7jNVr
संबंधित बातमी:
आमीरची आई वयाच्या 91 व्या वर्षी सिनेमात दिसणार, लेकाच्या सिनेमातून पदार्पण करणार!
























