Shreejaya Chavan : मी नवीन आहे, मला सुद्धा साथ द्या, अशोक चव्हाणांच्या लेकीची भाषणातून मतदारांना साद
Shreejaya Chavan, नांदेड : "मी नवीन आहे मला साथ द्या माझ्या आजी आजोबा आई बाबा यांना तुम्ही साथ दिली आता मला ही द्या", असं म्हणत भाजप नेते अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण (Shreejaya Chavan) यांनी नांदेडमधील मतदारांना साद घातली आहे."
Shreejaya Chavan, नांदेड : "मी नवीन आहे मला साथ द्या माझ्या आजी आजोबा आई बाबा यांना तुम्ही साथ दिली आता मला ही द्या", असं म्हणत भाजप नेते अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण (Shreejaya Chavan) यांनी नांदेडमधील मतदारांना साद घातली आहे. आज भोकर तालुक्यातील पिंपळढव येथे गिरीश महाजन यांच्या हस्ते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसेच महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्रीजया चव्हाण बोलत होत्या.
गेल्या काही दिवसांपासून श्रीजया चव्हाण भोकर मतदारसंघात फिरताना दिसत होत्या
भोकर मतदारसंघात आज 926 कोटींचा भूमिपूजन कार्यक्रम पालकमंत्री गिरीश महाजन यांचा उपस्तित पार पडले. मात्र या भूमीपूजन सोहळा चर्चेत आला तो श्रीजया चव्हाण यांचा भाषणामुळे. श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रीजया चव्हाण भोकर मतदारसंघात फिरताना दिसत होत्या,मात्र त्यांनी थेट मतदारांना साद घातली आहे.
वाढदिवसानिमित्त भावी आमदार आशयाचे होर्डिंग झळकले होते
गेल्या काही दिवसांत श्रीजया या वडील अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक कार्यक्रमात दिसून आल्या होत्या. 26 मे रोजी त्यांचा वाढदिवस असतो. गेल्या वर्षी देखील श्रीजया चव्हाण यांचे 'भावी आमदार' अशा आशयाचे शुभेच्छापर होर्डिंग नांदेड शहरात झळकलेले पाहायला मिळाले होते. त्यामुळे चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होतेय हे नक्की. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाण यांना राज्यसभा दिली आहे. मात्र, तरी देखील नांदेडच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभव स्वीकारावा लागला होता. आता भाजप अशोक चव्हाण यांच्या मुलीला उमेदवारी देणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अशोक चव्हाण यांना काँग्रेसकडून दोन वेळेस मुख्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. अनेकदा ते मंत्रिपदावरही होते. मात्र, फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर नांदेडमध्ये फायदा होईल, असा अंदाज भाजपचा होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपला नांदेडमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागलाय.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Assembly Election 2024 : भाजपला 95 ते 105 जागा, उद्धव ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज; टाईम्स-MATRIZE सर्व्हेने कुणाकुणाची धाकधूक वाढणार?