एक्स्प्लोर

Shivsena UBT-MNS Alliance BMC Election 2026: आदित्यसह अमित ठाकरे आज शिवसेना भवनात पोहोचणार; राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या बैठकीत काय काय घडलं?

Shivsena UBT-MNS Alliance BMC Election 2026: राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. आता सर्वच राजकीय पक्षाकडून प्रचाराला सुरुवात होईल. राज्यभरात अनेक मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा, संयुक्त सभा आणि मेळाव्याचं नियोजन करण्यात आलंय.

Shivsena UBT-MNS Alliance BMC Election 2026 मुंबई: राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. आता सर्वच राजकीय पक्षाकडून प्रचाराला सुरुवात होईल. राज्यभरात अनेक मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा, संयुक्त सभा आणि मेळाव्याचं नियोजन करण्यात आलंय. यासाठी काही पक्षांकडून स्टार प्रचारकांच्या याद्या सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत तर काहींनी यादी जाहीर न करता सर्व महत्त्वाच्या नेत्यांच्या सभांचं नियोजन करायला सुरुवात केली आहे. जिथे जिथे ज्या ज्या पक्षाची ताकद आहे. तिथे त्या पक्षाचे महत्त्वाचे नेते सभा घेतील अशा प्रकारे नियोजन केलं जातंय. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ उद्या फुटणार आहे. वरळी डोम इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संयुक्त मेळावा होणार आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधंकडूनही (Raj Thackeray-Uddhav Thackeray) संयुक्त सभांचं आयोजन करण्यात आलंय. 5 जानेवारीला पहिली सभा घेतली जाणार आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस त्यासोबतच काँग्रेस पक्षसुद्धा आपल्या स्टार प्रचारकांच्या विविध सभांसाठी मैदानात उतरणार आहेत. (BMC Election 2026)

आदित्यसह अमित ठाकरे आज शिवसेना भवनात पोहोचणार- (Amit Thackeray-Aditya Thackeray)

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेचे नेते अमित ठाकरे दादरमधील शिवसेना भवनात जाणार आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित असणार आहेत. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे मुंबईतील शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या 227 उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. आज दुपारी 2 वाजता शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार युतीच्या मुंबई महानगरपालिकेतील 227 उमेदवारांशी शिवसेनाभवन दादर येथे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत. तर  4 जानेवारीला राज ठाकरे स्वतः शिवसेना भवनात येणार आहेत. वचननामा जाहीर करण्याचा कार्यक्रम सेना भवन येथे होणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. (Amit Thackeray-Aditya Thackeray)

काल उद्धव ठाकरे आदित्यसह पोहोचले शिवतीर्थावर- (Shivsena UBT-MNS Alliance)

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काल (1 जानेवारी) राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या प्रचार रणनीतीवर चर्चा झाली. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे उमेदवारांच्या निश्चितीसाठी मातोश्रीवर गेले होते. युती घोषित झाल्यापासून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये वारंवार बैठका होत आहेत. 

मुंबईत 114 जागांचा जादुई आकडा कोण गाठणार? (BMC Election 2026)

राज आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे भावांनी 24 डिसेंबर रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे. मुंबईच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला आली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आता 'ठाकरे बंधू विरुद्ध महायुती' असा थेट सामना रंगणार आहे. मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी 114 हा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना (महायुती) एकत्र लढणार आहे.  त्यामुळं या निवडणुकीत बहुमताचा म्हणजेच 114 जागांचा जादुई आकडा कोण गाठणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. (BMC Election 2026)

निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान, प्रचारसभांचा धुरळा, VIDEO:

संबंधित बातमी:

BJP-Shivsena UBT Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटापासून भाजपापर्यंत, सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Prithviraj Chavan : कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी नावं काढली असती तर कदाचित निकाल वेगळा असता: पृथ्वीराज चव्हाण
कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी लेखी निवेदन दिलेलं पण... : पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget