एक्स्प्लोर

Raj Thackeray & Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे वर्धापनदिन सोहळ्यात मोठी घोषणा करण्याच्या तयारीत, राज ठाकरेंच्या मनसेशी युती करणार की नाही?

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे यांच्याशी युती करण्यासाठी उद्धव ठाकरे कधी नव्हे इतके सकारात्मक आहेत. उद्धव यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांकडून मनसेशी युती करण्याबाबत मतं जाणून घेतली.

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रं हाती घ्यावीत, ही राज्यातील जनतेची आणि लोकांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या इच्छेचा स्वीकार केला आहे. याबाबत उद्धव ठाकरे आज वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बोलतील, असे संकेत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी मनसेशी (MNS) युती करण्यासाठी ठाकरे गट कोणताही त्याग करायला तयार असल्याचे सूचित केले. 

आज संध्याकाळच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे मनसेशी युती करण्याबाबत बोलतील ही अपेक्षा आहे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की, मराठी माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेबांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे. उद्धव ठाकरे कधीही तुटेपर्यंत ताणत नाहीत, असे संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना आजपर्यंत कोणापुढे झुकली नाही. ही डरपोकांची संघटना नाही तर मर्दांचा महासागर आहे. काही लोक आमच्या पाठीवर वार करुन निघून गेले. पण आम्ही एकटे असलो तरी लढत राहू, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी बॅनरवर संस्थापक म्हणून अमित शाहांचा फोटो वापरावा: संजय राऊत

आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. काही हौशे-नवशे देखील त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यांनी वर्धापन दिनाचे बॅनर्स लावले आहेत. त्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा काय संबंध आहे. त्यांनी संस्थापक म्हणून अमित शाहांचा फोटो वापरला पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.

Shivsena Vardhapan din: मुंबईत शिवसेनेचे दोन वर्धापन दिन मेळावे

आज मुंबईत शिवसेनेचे दोन वर्धापन दिन मेळावे आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून काल घेण्यात आली माजी नगरसेवकांची बैठक. सहा महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. ३ डिसेंबरला घेतलेल्या बैठकीत ६४ माजी नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत होते. मात्र, मागील सहा महिन्यात ९ माजी नगरसेवकांनी ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 55 माजी नगरसेवक आहेत. 

शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकाधिक माजी नगरसेवक आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे डॅमेज कंट्रोलसाठी रणनीती  ठरवण्यासाठी  बैठका घेणे सुरू आहे. आजच्या वर्धापन दिन मेळाव्यामध्ये सुद्धा माजी नगरसेवकांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष असेल. 

आणखी वाचा

फडणवीसांच्या भेटीनंतर आता एकनाथ शिंदेंचा डाव, राज ठाकरेंना आपल्या बाजूने वळवण्यासाठी 'या' शिलेदारावर सोपवली खास जबाबदारी

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: 'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ
'एकनाथ शिंदेंप्रमाणे फडणवीसांनीही आपली चूक मान्य करावी, पण ते आता...’; मनोज जरांगेंनी पुन्हा डागली तोफ

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget