Raj Thackeray & Eknath Shinde: फडणवीसांच्या भेटीनंतर आता एकनाथ शिंदेंचा डाव, राज ठाकरेंना आपल्या बाजूने वळवण्यासाठी 'या' शिलेदारावर सोपवली खास जबाबदारी
MNS Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु, आता एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव टाकला आहे.

Raj Thackeray & Shivsena: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरु असतानाच आता महायुतीकडून राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून मनसे (MNS) भाजपशी हातमिळवणी करणार, अशी चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता महायुतीचा भाग असणाऱ्या शिंदे गटानेही (Shivsena Shinde Camp) राज ठाकरे यांची महत्त्व ओळखून त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
आगामी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे हे आपल्यासोबत असावेत यासाठी उद्धव ठाकरेही प्रयत्नशील आहेत. परंतु, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतं त्यांच्याकडे वळण्याचा धोका आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून मनसेसोबत युतीची वक्तव्यं आणि बॅनरबाजी सुरु आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवली आहे. काही दिवसांपूर्वी उदय सामंत शिवतीर्थवर 'खिचडी' खाण्यासाठी गेले होते. तेव्हापासून मनसे आणि शिंदे गटाची चर्चा सुरु असून या वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. ही चर्चा पूर्णत्वाला नेण्यसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनासाठी निमंत्रण पाठवले जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray & Uddhav Thackeray: ठाकरे गट-मनसेच्या कार्यकर्त्यांना युती हवी पण वरिष्ठ नेत्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव
ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जरी दोन्ही भाऊ एकत्र येण्याबाबतची इच्छा असली तरी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये तसा उत्साह नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मनसेपुढे दोन्ही शिवसेनेचे पर्याय असताना, मनसे दोघांपैकी एकासोबत युती करणार की ''एकला चलो रे'' ची भूमिका स्वीकारणार, हे पाहणं महत्वाचे ठरेल. मनसे स्वतंत्र लढल्यास मराठी मतांची विभागाणी होऊन त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळे भाजपसाठी राज ठाकरे यांनी स्वतंत्र लढण्याचा पर्याय लाभदायक ठरेल.
आणखी वाचा
























