एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav: ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री, मला परिणामांची चिंता नाही; भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात आक्रमक पवित्रा

Bhaskar Jadhav: लढाई कितीही मोठी होऊ द्या. माझी राजकीय कारकीर्द संपली तरीही चालेल, असे सांगत भास्कर जाधव यांनी गुहागरमधील ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात दंड थोपटले.

Bhaskar Jadhav news: गेल्या काही दिवसांपासून गुहागर तालुक्यातील ब्राह्मण सहाय्यक संघ आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यात पेटलेला वाद शिगेला पोहोचला आहे. भास्कर जाधव यांनी सोमवारी मुंबई पार पडलेल्या मेळाव्यात ब्राह्मण सहाय्यक संघ नेत्यांवर अत्यंत टोकाची टीका केली. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे (Brahman Sahayak Sangh) गुहागर तालुका अध्यक्ष घनशाम जोशी यांना बेडकाची उपमा दिली. तसेच ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात. आज मी जे बोलतोय, त्याचे परिणाम काय होतील याची मला चिंता नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी बौद्ध समाजाला माझ्याविरोधात भडकवण्यात आले होते. वंचित आघाडीचे अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झालास त्यात माझं नाव घेण्यात आले. ठाण्यातील त्या राजकीय नेत्याला देखील मी सोडणार नाही. घनशाम जोशी यांनी  पक्ष म्हणून पत्र लिहिलं असतं तर काही वाटल नसतं, पण समाज म्हणून पत्र लिहिलं याचे वाईट वाटले. माझ्याविरोधात जिल्ह्यात पत्र द्या, नाहीतर राज्यात द्या, मी ते गटारात फेकून देतो, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

लढाई कितीही मोठी होऊ द्या. माझी राजकीय कारकीर्द संपली तरीही चालेल, पण माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना मी सोडणार नाही. तात्यासाहेब नातू यांच्या निवडणुकीत अंगावर केसेस घेणारा भास्कर जाधव आहे. माझ्या आईला शिव्या दिल्या तेव्हा विनय नातू टाळ्या वाजवत होते. समोरासमोर ते माझ्याशी दोन हात करू शकत नाहीत, म्हणून बदनाम करून खच्ची करण्याचे काम सुरु आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले. यावेळी त्यांनी गुहागरमधील कुणबी समाजालाही सावधानतेचा इशारा दिला. मी बाजूला झालो की तुम्हाला गिळून टाकलं म्हणून समजा. तुमच्या घरात उद्या पूजा सांगायला कोणी आले नाही तर घाबरु नका, मी पूजा सांगायला येईन. हे लोक स्वत:च्या घरात पूजा घालतात का ते विचारा, अशी टिप्पणीही भास्कर जाधव यांनी केली.

Guhagar News: मला अटक करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन: भास्कर जाधव

2024च्या निवडणुकीला प्रचारादरम्यान मी जातीवाचक बोललो असा आरोप माझ्यावर करुन  माझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करून मला आत मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न माझ्या घरावर झाला. निवडणुकीच्या काळात माझं संरक्षण काढून घेतले.  रत्नागिरीचे एसपी धनंजय कुलकर्णी यांना सुद्धा मी सांगितलं की, तुमच्यावर दबाव असेल पण सत्य तपासा. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि वरून सगळ्या नेत्यांचे फोन येत होते, भास्कर जाधव यांना अटक करा.  पण एसपीने सांगितलं लहानसा जरी पुरावा सापडला तरी मी त्यांना अटक करेन. मला तुमच्याशी आज खूप काही बोलायचं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. मी जर बोललो नाही तर भविष्यातला काळ अडचणीचा असेल. माझी निवडणूक आत्ताच झाली आहे, चार वर्ष मला काही अडचण नाही. मला अनेक जण सोडून गेले मी त्यांच्याबद्दल काही बोललो नाही. अनेक जण माझा फायदा घेत गेले, पण मी काहीच बोलत नाही म्हणून त्यांना असं वाटायला लागलं की हा काहीच करू शकत नाही. पण आतापर्यंत मी काही बोलत नव्हतो पण आता मी कोणाला सोडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात म्हटले.

Bhaskar Jadhav on Kunbi: मी बाजूला झालो की तुम्हाला गिळून टाकलं म्हणून समजा; भास्कर जाधवांचा कुणबी समाजाला इशारा

गुहागरमध्ये संघर्षाला तोंड त्यांनी फोडलं आहे. भास्कर जाधव कोणाला घाबरणार नाही. त्याचं प्रेम कुणबी समाजावर नाही हे समजून घ्या.  सर्वात मोठा समाज असलेल्या कुणबी समाजाचे रामभाऊ  बेंडल एकदाच कसे निवडून आले याचा विचार करा. समाजाचे नेतृत्व संपवण्यासाठी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. समाजात तेढ निर्माण करणारे हेच अनाजीपंत आहेत. मी 20 गावाहून जास्त गावचा दस्त भरणारा मी खोत आहे. सावध व्हा, हा शेवटचा वार आहे, भास्कर जाधव सहज हटणार नाही. मी बाजूला झालो की तुम्हाला गिळून टाकलं म्हणून समजा. तुमच्या घरात उद्या पूजा सांगायला कोणी आले नाही तर घाबरु नका, मी पूजा सांगायला येईन, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

माझी त्या दिवशीची सभा राजकीय होती आणि त्या राजकीय व्यासपीठावर मी दोन चार कार्यकर्त्यांबद्दल बोललो आणि ते विशेष समाजाचे असतील तर त्या समाजावर तो विषय गेला? तीन-चार भाजपाच्या लोकांची नाव घेतली आणि त्यानंतर ब्राह्मण समाजाच्या तालुका अध्यक्षांनी निषेधच पत्र माझ्याबद्दल लिहिले. एक क्लिप मी बघितली त्यामध्ये म्हटलं भास्करराव ब्राह्मण समाज जागा झाला तर तुम्हाला अवघड होईल. म्हणजे तुम्ही दुसऱ्या समाजाबद्दल काही बोलायचं,  निवडणूक आली की अनेकांना जात दिसते. त्यांना वाटत होतं या निवडणुकीत मला पाडतील, भास्कर जाधव आपल्याला घाबरेल. भास्कर जाधव वाघाची अवलाद आहे. मी लढणार आहे मी सहजासहजी गुडघे टेकणार नाही. एक शब्द न बोलता तुम्ही माझ्या विरोधात निषेधाचं पत्र काढता मेला की काय मराठा समाज? महाराष्ट्रात कोणाला पैसा कमी पडेल, पण विकाससाठी भास्कर जाधव एक रुपया तुम्हाला कमी पडू देणार नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

आणखी वाचा

मला अटक करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन; भास्कर जाधवांनी सांगितलं राज'कारण'

अरे कितीबी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास! ब्राह्मण सहाय्यक संघाशी वादानंतर भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget