एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav news: अरे कितीबी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास! ब्राह्मण महासंघाशी वादानंतर भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा

Bhaskar Jadhav and brahman Mahasangh: ब्राह्मण महासंघाशी वाद, आता भास्कर जाधवांची कडाडून टीका. 'भिडा किती, तुम्ही नडा किती, द्या द्यायचा तेवढा त्रास... कितीबी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास'

Bhaskar Jadhav and brahman Mahasangh: हेदवतडमधील सभेत खोतकीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि ब्राह्मण महासंघात वादाचा ठिणगी पडली होती. हेदवतड येथील राजकीय सभेमध्ये मी जर एखादे राजकीय वाक्य बोललो, तर त्याचा संबंध संपूर्ण ब्राह्मण समाजाशी जोडणे योग्य नाही, असे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी म्हटले होते. तर ब्राह्मण महासंघानेही (brahman Mahasangh) भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. भास्कर जाधव हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला बाधा आणत आहेत. त्यांनी राजकीय प्रवासात ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवल्याची आठवणही ब्राह्मण महासंघाने करुन दिली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी त्यांच्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवरुन ब्राह्मण संघाला इशारा देत दंड थोपटले आहेत. भास्कर जाधव यांनी स्टेटसला एक गाणे ठेवले आहे. 'भिडा किती, तुम्ही नडा किती, द्या द्यायचा तेवढा त्रास... कितीबी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास', असा आशयाचे हे गाणे आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघ आणि भास्कर जाधव यांच्यातील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

Bhaskar Jadhav news: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले होते?

भास्कर जाधव यांनी गुहागरच्या हेदवतडमधील सभेत भाजपचे दिवंगत आमदार तात्यासाहेब नातू यांचा उल्लेख केला होता. 1975 पासून राजकीय प्रवास मांडत गुहागरचे भाजपचे तत्कालीन आमदार स्वर्गीय तात्यासाहेब नातू यांच्या निवडणुकीतला प्रचारातील सक्रिय सहभाग घेतल्याची आठवण भास्कर जाधव यांनी करून दिली होती. गुहागरच्या इतिहासात पहिल्या पंचायत समिती सभापती ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला बसवल्याचेही त्यांनी म्हटले होते. याशिवाय भास्कर जाधव यांनी गुहागर तालुका ब्राम्हण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनशाम जोशी यांना एक जाहीर पत्र लिहले होते.

या पत्रातून भास्कर जाधव यांनी घनशाम जोशी यांच्यावर टीकेचे आसूड ओढले होते. इतिहासाचे सिंहावलोकन मी जरुर करतो पण त्यामध्ये रमणारा कार्यकर्ता नाही. मी फायद्यासाठी पक्षांतर केलं? पण तुम्ही युतीमध्ये राहून गद्दारी करणारे गद्दार आहात. माझे प्रिय मित्र विनूभाऊ मुळे यांचा उल्लेख आपण पत्रामध्ये केला आहात. त्यांच्या पत्नीला मी दोन वेळा गुहागर पंचायत समितीच्या सभापती केलं. गुहागर तालुक्यात ब्राह्मण समाजातील व्यक्तीला प्रथमच सभापती होण्याचा बहुमान मी मिळवून दिला. त्याबद्दल एखादे कौतुकाचे पत्र पाठवण्याकरता तुम्हाला लाजच वाटली असावी. तसेच प्रवीण ओक यांचा उल्लेख आपण केलात. त्या प्रवीण ओक व त्यांच्या सौभाग्यवती पूर्वा ओक यांना देखील दोन दोन वेळेला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली व त्यांना निवडून आणलं. श्रीमती गीता खरे यांना नगरपंचायतीमध्ये निवडून आणून सभापती केलं, हे तुम्ही सोयीस्कररित्या विसरलात. त्यामुळे एखाद्या राजकीय सभेमध्ये मी जर एखादे राजकीय वाक्य बोललो असेल तर त्याचा संपूर्ण समाजाशी संबंध जोडणं हे तुमच्यासारखे पाताळयंत्रीच करू शकतात.

मी राजकारणात आहे म्हणजे निवडणुका जिंकणं हे मी माझं कर्तव्यच समजतो, मी काय आश्रमशाळा नाही चालवत. 2007 साली मी गुहागरमध्ये काम करायला सुरुवात केली, भोळ्याभाबड्या जनतेचा त्रास व दुःख डोळ्याने पाहिले. लेखणीचा दहशतवाद पाहिला. या जाचातून मुक्त होण्यासाठी ते एका आश्वासक नेतृत्वाची वाट पाहत होते आणि माझ्या रुपात त्यांनी ते पाहिले ही का माझी चूक? कामाने आणि संपर्काने मला हरवता येत नाही म्हणूनआपल्यासारख्या अनेक महानुभवांनी मला बदनाम करण्यासाठी वारंवार षडयंत्र रचली, जाती-पातीच विष या तालुक्यात कालविण्याचे काम केले गेले, असे भास्कर जाधव यांनी पत्रात म्हटले होते.

आणखी वाचा

राजकीय स्वार्थासाठी ऐक्याला बाधा, भास्कर जाधवांविरोधात ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक, जाधवांचंही चोख प्रत्युत्तर 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget