एक्स्प्लोर

Shivaji vategaonkar: 'एवढा मोठा झाला का तू; तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही...', बापु बिरूच्या पोराने गोपीचंद पडळकरांना भरला सज्जड दम

Shivaji vategaonkar On Gopichand Padalkar : तू जत तालुक्यातून निवडून येऊन दाखवच. तुला समाजात काही काडीचीही किंमत नाहीत, असं म्हणत शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांवर टीका केली आहे.

Gopichand Padalkar Controversy : भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना, जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. गोपीचंद पडळकर यांनी राजाराम बापू यांच्याबद्दल देखील वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावरती टीकेची झोड उठली, मात्र त्यानंतर त्यांनी माफी मागण्यास देखील नकार दिला होता ते त्यांच्या वक्तव्यावरती ठाम होते. पडळकरांच्या या वक्तव्याचा वाळवा तालुक्यात जोरदार निषेध करण्यात आला, शरद पवारांनी याबाबत देवेंद्र फडणवीसांना फोन करत याबाबत नाराजी व्यक्त केली. फडणवीसांनी या वक्तव्यानंतर पडळकरांना फोन केल्याचीही माहिती समोर आली होती. त्यानंतर आता बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना थेट इशारा दिला देत दम भरला आहे. (Gopichand Padalkar) 

Gopichand Padalkar Controversy: तुझे कपडे काढूनच...

बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांच्या वक्तव्याबाबत म्हटलं की, जयंत पाटालांविरूद्ध काहीतरी बोलतो. तो माणूस तुला काही आलतू फालतू वाटला का, तू वाळवा तालुक्यात यायचा विचार कर तुझे कपडे काढूनच तुला पाठवतो. तू जत तालुक्यातून निवडून येऊन दाखवच. तुला समाजात काही काडीचीही किंमत नाहीत, असं म्हणत शिवाजी वाटेगावकर यांनी म्हटलं आहे. तर धनगर समाजाला त्यानं मान खाली घालायला लावली. बापूंसारख्यांवर तो बोलतो एवढा मोठा झाला का तू..., असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Gopichand Padalkar Controversy: तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही 

पुढे शिवाजी वाटेगावकर म्हणाले, वाळवा तालुक्यात यायचा विचार कर तुझे कपडे काढूनच पाठवतो. तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही, असं म्हणत शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना इशारा दिला आहे. तसेच शरद पवार गटाने देखील गोपीचंद पडळकरांना टीका केली आणि राज्यभर आंदोलनं सुरू आहेत. या प्रकरणावर खुद्द शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून फडणवीसांनी पडळकरांना समज देखील दिला आहे.                

शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना फोन (Sharad Pawar Call Devendra Fadnavis)

गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केलंय ते योग्य आहे, असं माझंही मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल विधान करणं योग्य नाही. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मला शरद पवारांचा फोन आला होता. मीही त्यांना सांगितलं, अशा प्रकारच्या विधानाचं आम्हीही कधीच समर्थन करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांचा मला फोन आला

खुद्द भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता. यासंदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना त्यांनी मला दिली आहे. मी त्यांच्या सूचनेचे पालन करेन. फडणवीस यांनी मला ज्या सूचना दिल्या आहेत त्या मी पाळणार आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.  

Padalkar Statments Controversy: गोपीचंद पडळकर यांची या आधीची वादग्रस्त वक्तव्यं

- जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद वाटतं नाही, काही तर गडबड आहे.
- शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोनो.
- शरद पवार यांना गेल्या 80 वर्षानंतर अक्कल यायला लागली आहे.
- महाराष्ट्रात जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा कोण हे सर्वांना माहिती.
- सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन् आई दुसरीच, पुण्यात एक कॉकटेल घर; पवार कुटुंबीयांचे नाव न घेता भाजपचे गोपीचंद पडळकर बरळले.
- धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कुणी 'सैराट' करेल त्याला 11 लाखांचे देणार.
- रोहित पवार हा औरंगजेबाच्या वृत्तीचा, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते. औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा घात केला.
- जयंत पाटील कासेला मोठे पण दुधाला नाही, त्यांनीच सांगलीच सर्वाधिक वाटोळं केलं.
- जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस, आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करु.
- मुस्लिम धर्मात अनेक जाती, पण ते त्यांच्यात लग्न करत नाहीत आणि आमच्या मुली बाटवतात. ज्याच्या डोक्यावर टीळा त्याच्याकडूनच माल खरेदी करा.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget